महाराष्ट्र जैविक विविधता नियम 2008
१७. जैविक साधनसंपत्ती पहावयास मिळण्याची व ती गोळा करण्याची कार्यपध्दती
१. जैविक साधनसंपत्ती असणाऱ्या क्षेत्रात प्रवेश मिळण्याची मागणी करणारी, आणि अशी जैविक साधनसंपत्ती व तत्संबंधित ज्ञान संशोधनासाठी किंवा वाणिज्यिक प्रयोजनासाठी गोळा करू
इच्छिणारी कोणतीही व्यक्ती, या नियमांना जोडलेल्या नमुना एक मध्ये मंडळाकडे अर्ज करील. असा प्रवेश, संशोधनाच्या प्रयोजनासाठी असेल तर प्रत्येक अर्जासोबत रू. ५००/-इतकी फी आणि वाणिज्यिक वापरासाठी असेल तर रू. ५०००/- इतकी फी भरण्यात येईल. अशी फी धनादेशाच्या किंवा दर्शनी धनाकर्षाच्या स्वरूपात भरण्यात येईल. अर्ज नाकारण्यात आल्यास, अर्जदारास त्यापैकी चार पंचमांश इत्तकी फी परत करण्यात येईल.
२. मंडळ, अर्जाचे योग्य ते मुल्यांकन केल्यानंतर आणि संबंधित स्थानिक संस्थांशी विचार विनिमय केल्यानंतर आणि त्यास आवश्यक वाटेल अशी अतिरीक्त माहिती गोळा केल्यानंतर, शक्यतोवर तो अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत, त्या अर्जावर निर्णय करील.
स्पष्टीकरण या नियमांच्या प्रयोजनार्थ, ” विचारविनिमय या संज्ञेत. पुढील कोणत्याही टप्प्यांचा समावेश होतो. (अ) प्रवेशाबाबतच्या किंवा गोळा करण्याबाबतच्या प्रस्तावाची, स्थानिक भाषेत जाहीर नोटीस देणे, (ब) स्थानिक संस्थेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा करणे किंवा संवाद साधणेः किंवा (क) प्रस्तावाची आणि जैविक साधनसंपत्तीचे संरक्षण आणि त्याच्याशी निगडीत उपजीविका यांवर होणारा त्यांचा गर्भित परिणाम या संबंधात पुरेशी माहिती दिल्यानंतर सभेची औपचारिक संमती घेणे.
३. मंडळास खात्री पटल्यावर अर्ज मंजूर करता येईल किंवा असे कार्य जैविक विविधतेच्या संवर्धनाच्या आणि ती निरंतरपणे टिकून राहील अशा प्रकारे तिचा वापर केला जाण्याच्या किंवा अशा कार्यातून प्राप्त होणाऱ्या लाभांचे समन्यायी वाटप केले असेल तर, अशा कोणत्याही कार्यावर निर्बंध घालता येतील.
४. मंडळाचा प्राधिकृत अधिकारी आणि अर्जदार यांनी यथोचितरित्या स्वाक्षरी केलेल्या लेखी कराराद्वारे प्रवेशावर / गोळा करण्याच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यात येईल. कराराचा नमूना मंडळाकडून निश्चित करण्यात येईल.
५. ज्या जैविक साधनसंपत्ती असलेल्या क्षेत्रात प्रवेश करण्यास ती गोळा करण्यास मंजूरी देण्यात आली असेल त्या जैविक साधनसंपत्तीचे जतन व संरक्षण करण्याबद्दलच्या उपायांची तरतूद प्रवेशाबद्दलच्या / गोळा करण्याबद्दलच्या शर्तीमध्ये विनिर्दिष्टपणे करता येईल.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….