महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 (ह)
कलम 14 (ह) जी व्यक्ती पंचायतीला किंवा जिल्हा परिषदेला देणे असलेला कोणताही कर किंवा फी ज्या तारखेला अशा कराच्या किंवा फीच रकमेची मागणी केली असेल व त्या प्रयोजनासाठी यथोचित रित्या तिला बिल देण्यात आले असेल त्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत भरण्यात कसूर करील अशी व्यक्ती
किंवा
14 (ह) (एक) जी कलम 140 अन्वये अधिभाराची किंवा आकाराची रक्कम किंवा कलम 178 खाली जी देण्याबद्दल आदेश देण्यात आला असेल अशी रक्कम व्याजासह कोणतीही असल्यास त्याबाबतीत तरतूद केलेल्या मुदतीत व अपील करण्यात आले असेल त्या बाबतीत असे अपील फेटाळल्याचा निर्णय मिळाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत देण्यात कसूर करील अशी व्यक्ती
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 नुसार अनहर्ता शासन निर्णय दिनांक 6 एप्रिल 1991 शासन निर्णय साठी येथे क्लीक करा
