विज्ञान विषय घेऊन इ १२ वी उत्तीर्ण शिक्षकांना विज्ञान विषय समूहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर पदवी अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांची पदस्थापना मूळ पदावर करणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २३-०६-२०२३
शासन परिपत्रक दिनांक १३.१०.२०१६ मधील अ.क्र. ६ येथील तरतूद वगळण्यात येत असुन, सदर तरतुदीनुसार विज्ञान विषय घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर सदर परिपत्रकाच्या दिनांकापर्यंत या शिक्षकांनी पदवी अर्हता धारण केली नसल्यास, अशा शिक्षकांची पदस्थापना मूळ पदांवर करण्यात यावी.
पदवीधर शिक्षकांच्या जेष्ठता सूची बाबत स्प्ष्टीकरण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक १४-११-२०१७
पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासूचीबाबत शासन परिपत्रक दिनांक १३.१०.२०१६ तसेच दिनांक २४.०१.२०१७ मधील सूचनांसह खालील बाबी सदर पदवीधर शिक्षक ज्येष्ठतासूची तसेच सामाईक ज्येष्ठता सूची याकरीता विचारात घेण्यात याव्यातः-
१. पदवीधर ज्येष्ठतासूची ही संबंधित शिक्षकास पदवीधर वेतनश्रेणी मान्य करण्याकरीता विचारात घेण्यात यावी.
२. सामाईक ज्येष्ठतासूची ही पदोन्नतीच्या प्रयोजनार्थ विचारात घेण्यात यावी.
शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०१६/प्र.क्र.३२०/टीनटी-१
३. पदवी मान्यता बी.ए./बी.कॉम/बी.एससी ही शैक्षणिक स्वरुपाची पदवी असून प्राथमिक शिक्षक पदाकरीता आवश्यक असलेल्या मूळ अर्हतेशिवाय त्या-त्या पदासाठीची अधिकची अर्हता आहे.
४. पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित शिक्षकाचा पदवीधर शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश होईल. सदर यादीतील त्याचा ज्येष्ठतेचा दिनांक हा अखंड सेवेतील शिक्षक पदावरील प्रथम नियुक्तीचा जो दिनांक असेल, तो दिनांक राहील.
५. शिक्षक संवर्गात प्रथम नियुक्ती दिनांक व अखंड सेवा विचारात घेवून तयार करण्यात आलेली सामाईक ज्येष्ठतासूची पदोन्नतीकरीता विचारात घेण्यात यावी व पदोन्नतीच्या पदाकरीता आवश्यक असणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनुभवाच्या अटीसह पदोन्नतीच्या वेळेस संबंधित शिक्षक धारण करीत असेल तर, पदोन्नतीच्या पदासाठी संबंधित शिक्षकाचा विचार करावा.६. महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम १२ अनुसूची-फ मधील तरतूदीनुसार प्रवर्ग “क” मध्ये अंतर्भाव होण्यासाठी संबंधित शिक्षकाने सदर प्रवर्गाकरीता विहित केलेली अर्हता धारण करणे आवश्यक राहील. [उदा. एस.टी.सी./डीप.एड. (एक वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा तत्सम व्यावसायिक अर्हताधारक शिक्षकांचा अंतर्भाव प्रवर्ग “क” मध्ये होण्यासाठी त्या शिक्षकाची सेवा किमान १० वर्ष झालेली असणे आवश्यक राहील.] ७. पदोन्नतीकरीता विचारात घ्यावयाची सामाईक ज्येष्ठतासूची ही उच्च प्राथमिक स्तराबरोबरच (इयत्ता ६ वी ते ८ वी) माध्यमिक (इयता ९ वी ते १० वी) तसेच उच्च माध्यमिक (इयत्ता ११ वी ते १२ वी) स्तरांकरिताही विचारात घेण्यात यावी.