महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन नियमावली २०२१ राजपत्र अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग दि २१-०६-२०२१
1.व्याख्या:-
1. तदर्थ पदोन्नती:- तदर्थ निवडसूचीस अंतिम मान्यता प्राप्त झाल्यावर देण्यात येणारी पदोन्नती.
2. तदर्थ निवडसूची:- प्रशासनाची तातडीची गरज म्हणून तदर्थ पदोन्नती देण्यासाठी तयार केलेली निवडसूची.
3.कोणतेही पदावरील,संवर्गातील किंवा सेवेतील अखंड सेवा:- एखाद्या व्यक्तीने त्या पदावर,संवर्गात किंवा सेवेत प्रत्यावर्तन न होता अखंडपणे केलेली सेवा.
4.थेट भरती केलेली व्यक्ती:- विहीत केलेल्या सेवा प्रवेश नियमातील तरतूदीनुसार नियुक्ती केलेली व्यक्ती.
5.अभावित व्यक्ती:- संबंधित सेवाभरती नियमांच्या तरतूदीनुसार नियमीत नियुक्ती करणे प्रलंबित असेपर्यंत केलेली तात्पुरती नियुक्ती.
6.नियमित पदोन्नती:- नियमित निवडसूचीसअंतिम मान्यता प्राप्त झाल्यावर देण्यात येणारी पदोन्नती.
7.निवडसूची:- याबाबतीत तयार केलेल्या नियमांनुसार किंवा मार्गदर्शक सूचनांनुसार निम्न पदावरुन,संवर्गातून किंवा सेवेतून वरिष्ठ पदावर,संवर्गात किंवा सेवेत पदोन्नती देण्यासाठी निवड केलेल्या व्यक्तींची सूची.
8.नियमित निवडसूची:- पदोन्नतीच्या कोटयातील त्या निवडसूची वर्षातील प्रत्यक्ष रिक्त व संभाव्य रिक्त पदे अशा एकूण रिक्त पदांकरीता संबंधित सेवाप्रवेश नियमानुसार तयार केलेली निवडसूची.
9.तात्पुरती पदोन्नती:- नियमित निवडसूचीच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास न्यायप्रविष्ट प्रकरण किंवा तात्पुरती जेष्ठतासूची किंवा अन्य कारणाच्या अधीन राहून देण्यात आलेली तात्पुरती पदोन्नती.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
३० दिवसांचा विहित कालावधी संपल्यानंतर, अपवादात्मक परिस्थितीत, रुजू होण्यास मुदतवाढ द्यावयाची झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली १९८२, मधील नियम ४ (२) (अ) नुसार नियुक्ती प्राधिकाऱ्यांना संबंधित उमेदवारास स्वविवेकानुसार रुजू होण्यास केवळ एक महिन्याचा वाढीव कालावधी देता येईल. तद्नंतर उमेदवारांकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही कारणांचा/ विनंतीचा विचार करण्यात येऊ नये.
परंतु असा उमेदवार केंद्र शासन/राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असेल आणि विहित मार्गाने अर्ज करुन, त्याची राज्य शासन सेवेतील अन्य पदावर सरळसेवेने नियुक्ती झाली असल्यास, अशा प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांना सरळसेवेने नियुक्तीच्या पदावर रुजू होण्याकरिता कार्यमुक्त करण्याच्या प्रक्रियेस लागणारा कालावधी विचारात घेता, संबंधित कर्मचाऱ्यास नवीन नियुक्तीच्या पदावर रुजू होण्यास, नियुक्ती प्राधिकाऱ्यांना स्वविवेकानुसार एक महिन्याऐवजी दोन महिन्याचा वाढीव कालावधी देता येईल.
२. दि.२८ मे, २०१८ च्या शासन निर्णयातील परिच्छेद १ मधील उपपरिच्छेद (३) नुसार विहित मुदतीत रुजू न होणाऱ्या उमेदवारांचे नियुक्तीचे आदेश रद्द केल्यानंतर त्यांचा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पुनर्नियुक्तीसाठी विचार करण्यात येऊ नये.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( सेवा प्रवेशोत्तर परीक्षा ) नियम १९८५ अनुसार दि २४-०५-१९९९ च्या अधिनुसूचने पूर्वी नियुक्त जि प कर्मच-याच्या सेवा जेष्ठता निश्चित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग दि ३१-०३-२०१७
(१) अशी परिक्षा विहीत वेळेत संधीत जो पर्यंत संबंधीत उमेदवार पास होत नाहीत तोपर्यंत त्यांना खालील बाबींचा लाभ मिळणार नाही. (अ) ज्या पदावर संबंधीत कर्मचारी कार्यरत आहेत त्या पदावर कायम करणे, (ब) ज्या पदावर ते (उमेदवार) कार्यरत आहेत त्या पदाची पुढील वेतनवाढ मिळणे.
(२) सदरच्या थोपवलेल्या वेतनवाढी, संबंधीत उमेदवार सेवा प्रवेशोत्तर परिक्षा पास झाल्यानंतर लगेच पूर्ववत सुरु करणे.
(३) नियुक्ती दिनांकानंतर सेवेत आलेले उमेदवार जर विहीत संधीत व विहीत वर्षात सदर पदाची सेवा प्रवेशोत्तर परिक्षा पास झाले नाहीत तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात.
६.तसेच अशा उमेदवारांना वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवा प्रवेशोत्तर परिक्षा पास होण्यापासून सूट दिलेली आहे.
७. सन १९९९ च्या नियमाद्वारे १९८५ च्या सेवा प्रवेश नियमातील नियम ५ (३) मध्ये (ज्यात सेवेतून काढून टाकण्याची तरतूद होती) सुधारणा करुन जे उमेदवार विहीत संधीत वा विहीत कालावधीत सेवा प्रवेश परिक्षा उत्तीर्ण होणार नाहीत अशा उमेदवारांना सेवा ज्येष्ठता गमवावी लागेल अशी तरतूद केलेली आहे. १९८५ च्या नियमातील अन्य तरतुदी संबंधीत उमेदवारांना लागू आहेत.
८. वरील सर्व बाबी पहाता सन १९८५ च्या सेवाप्रवेश नियमानुसार संबंधीत उमेदवार जर सेवा प्रवेशोत्तर परिक्षा विहीत वेळेत व संधीत पास झाले नाहीत तर त्यांना त्या पदावर कायम करता येत नाही म्हणजे जे उमेदवार कार्यरत पदावर कायमच नाहीत अशा उमेदवारांना सेवेत पदोन्नती देता येणार नाही. म्हणजे पर्यायाने त्यांचे नांव सेवा ज्येष्ठता यादीत येणार नाही. जोपर्यंत सदर उमेदवार पास होत नाहीत तोपर्यंत त्यांना सेवा ज्येष्ठता मिळणार नाही. त्यानंतर सदर परिक्षा पास होतील त्या दिवसाचा दिनांक त्यांना जेष्ठतेसाठी मिळणार आहे. मा. उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. १६१०/२००३ व रिट याचिका क्र.३६८८/२०११ मध्ये दिलेले अनुक्रमे दिनांक ५.१०.२०१४ व दिनांक २६.०८.२०११ चे आदेश पहाता जे उमेदवार १९९९ पूर्वी जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत आहेत अशा उमेदवारांना १९८५ चे सेवा प्रवेश नियम लागू होतील म्हणजे जोपर्यंत सेवा प्रवेशोत्तर परिक्षा पास होत नाहीत तोपर्यंत त्यांना सेवेत कायम करता येत नाही व सेवेत कायम नसलेल्या उमेदवारास पदोन्नती देता येत नाही वा असे उमेदवार पदोन्नतीस पात्र ठरत नाहीत. त्यावेळी असे उमेदवार सेवा प्रवेशोत्तर परिक्षा पास होतो ती तारीख अशा उमेदवारांच्या सेवा ज्येष्ठतेसाठी निश्चित करावयाची आहे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
गट अ व गट ब ( राजपत्रित पदावर पदोन्नती साठीच्या निवड सूचीचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर करण्याच्या कार्यपद्धती बाबत साप्रवि एसआरव्ही२०१०/प्र क्र ३४७/१०/१२ दि २४/०२/२०११
शासनसेवेतील अधिकारी/ कर्मचाऱ्याची जेष्ठतासूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्द करणे याबाबतचे सर्वकष धोरण साप्रवि एसआरव्ही२०११/प्र क्र २८४/१२ दि २१/१०/२०११
३. ज्येष्ठतासूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिध्द करणे यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. :-
(१) महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियम, १९८२ मधील तरतुदीनुसार, संबंधित संवर्गाची प्रत्येक वर्षी दि. १ जानेवारी आधारभूत दिनांक मानून तात्पूरती ज्येष्ठतासूची तयार करण्यात यावी. प्रत्येक संवर्गाची ज्येष्ठतासूची स्वतंत्र असावी. मात्र सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार पदोन्नतीसंदर्भात जे संवर्ग एकत्रित समजले आहेत वा आपसात बदलीपात्र आहेत अशा संवर्गाची ज्येष्ठतासूची एकत्रित ठेवता येईल.
(२) (अ) आधीच्या वर्षी प्रसिध्द झालेली अंतिम (final) ज्येष्ठतासूची पुढील वर्षी पून्हा नव्याने तात्पूरती (provisional) ज्येष्ठतासूची तयार करताना विचारात घेऊ नये व प्रसिध्द करण्यात येऊ नये. केवळ त्या संबंधित वर्षात नियमित पदोत्रती, सरळसेवा, वा अन्य विहित मार्गाने नियुक्त अधिकारी /कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली तात्पूरती अतिरिक्त (provisional additional) ज्येष्ठतासूची तयार करुन प्रसिध्द करावी.
(ब) या तात्पुरत्या अतिरिक्त ज्येष्ठतासूचीतील अधिकारी / कर्मचारी यांना आक्षेप नोंदविण्यास १५ दिवस इतका कालावधी देण्यात यावा. आक्षेप नोंदविल्यास त्याचे निराकरण करुन ज्येष्ठतासूची विभाग /कार्यालयाच्या स्तरावर १५ दिवसात अंतिम करावी. मात्र, ही विभाग कार्यालयाच्या स्तरावर अंतिम करण्यात आलेली ज्येष्ठतासूची स्वतंत्ररित्या प्रसिध्द करण्यात येऊ नये.
(क) आधीच्या वर्षाची अंतिम (final) ज्येष्ठतासूची व त्या संबंधित वर्षात विभाग / कार्यालयाच्या स्तरावर अंतिम केलेली ज्येष्ठतासूची एकत्रित करुन, पुढील वर्षाची दिनांक १ जानेवारी रोजीची अंतिम (final) ज्येष्ठतासूची १५ दिवसात प्रसिध्द करावी.
(३) ज्या संवर्गाच्या दि.१.१.२०१० पर्यंतच्या तात्पुरत्या (provisional) व त्यानंतर अंतिम (final) ज्येष्ठतासूच्या अद्याप प्रसिध्द झालेल्या नाहीत त्यांच्याबाबतीत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.:-
(अ) ज्या संवर्गाच्या दि.१.१.२००० पर्यंतच्या किंवा त्यापुर्वीच्या ज्येष्ठतासूच्या अद्याप प्रसिध्द झालेल्या नाहीत, त्यांच्याबाबतीत ज्या तारखेची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द झाली असेल त्यानंतरची दि.३१.१२.२००० पर्यंतची एकत्रित ज्येष्ठतासूची तयार करुन दि.१.१.२००१ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करावी. याबाबत आक्षेप नोंदविण्यास ३० दिवस इतका कालावधी देण्यात यावा. संबंधितांच्या आक्षेपाचे निराकरण करुन त्यानंतर ३० दिवसात अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करावी. ही सर्व कार्यवाही शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३ महिन्यात पूर्ण करावी. प्रत्येक वर्षीची ज्येष्ठतासूची न करता दि.१.१.२००१ पर्यंतची एकत्रित ज्येष्ठतासूची तयार करण्याची सूट एक विशेष बाब म्हणून देण्यात येत आहे. (ब) ज्या संवर्गाची दि.१.१.२००१ रोजीची ज्येष्ठतासूची अंतिमतः प्रसिध्द झाली आहे, त्यांच्याबायतीत तसेच वरील (अ) नुसार दि.१.१.२००१ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्यात येईल त्यांच्याबाबतीत दि.३१.१२.२००५ पर्यंतची एकत्रित ज्येष्ठतासूची तयार करुन दि.१.१.२००६ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करावी. याबाबत आक्षेप नोंदविण्यास तीन आठवडयाचा कालावधी देण्यात यावा.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासनसेवेतील अधिकारी/ कर्मचाऱ्याची जेष्ठतासूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्द करणे याबाबतचे सर्वकष धोरण साप्रवी शासन परिपत्रक, एस आरव्ही २००५-प्रक्र ५६/२००५/१२ दि ३०-९-२००५
शासनसेवेतील अधिकारी/ कर्मचाऱ्याची जेष्ठतासूची प्रत्येक वर्षी तयार करणे व प्रसिद्द करणे, साप्रवी शासन परिपत्रक, एस आरव्ही २००२-प्रक्र ३/२००२/१२ दि २७-३-२००२
महाराष्ट्र नागरी सेवा ( जेष्ठतेचे विनीयमन) शुद्धीपत्रक GaD/ SRV-1086/2776/CR-5/87/XII Dt ०१/०४/१९८९
The Maharashtra Civil Seriches (Regulation Of Seniority) rules Amendment 1988 GaD/ SRV-1086/2776/CR-5/87/XII Dt 23/09/1988
शासनसेवेतील कर्मचाऱ्याची राजपत्रित अधिकाऱ्याची यादी तयार करणे प्रसिद्ध करणे साप्रवी शासन परिपत्रक, एस आरव्ही १०८७-६२४-१२ दि २१-४-१९८७
The Maharashtra Civil Seriches (Regulation Of Seniority) rules 1982 महाराष्ट्र नागरी सेवा १९८२( जेष्ठतेचे विनीयमन) GaD/ SRV-1076/XII Dt 21/6/1982