278
ठेव संल्ग्न विमा योजनेचा लाभ विनाविलंब अदा करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०७-११-२००७
निधन पावलेल्या भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराच्या वारसदारांना ठेव संलग्न विमा योजनेचा लाभ विनाविलंब मिळण्याच्या दृष्टीने प्रत्येक टप्प्यावर करावयाच्या कार्यवाहीसाठी कालमर्यादा संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये विहित करून देण्यात आलेली आहे. तसेच निधन पावलेल्या कर्मचा-यांच्या वारसदाराचा अर्ज येईपर्यंत वाट न पहाता शासकीय कर्मचारी मृत झाल्याची माहिती/सूचना मिळाल्यानंतर कार्यालय प्रमुखाने यासंदर्भात कार्यवाही करण्यास सुरवात करावी, असेही परिपत्रकात स्पष्ट केलेले आहे. तथापि, शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, काही कार्यालय-प्रमुखांकडून या योजनेचा लाभ वर्गणीदाराच्या वारसदाराला दिला जात नाही अथवा तो विलंबाने दिला जातो.
सबब सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व कार्यालय प्रमुखांनी मृत शासकीय कर्मचा-यांच वारसदारांना ठेव संलग्न विमा योजनेखाली देय असलेली रक्कम विनाविलंब देण्याची कार्यवाही करावी अशा सूचना पुन्हा देण्यात येत आहेत. तसेच दि. २१ नोव्हेंबर, १९९२ च्या शासन परिपत्रकात दिलेल्या कालमर्यादा पाळल्या जातील याची दक्षता घ्यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
You Might Be Interested In