Wednesday, February 11, 2026
Wednesday, February 11, 2026
Home » माहिती अधिकार अधिनियम, २००५ शासन निर्णय

माहिती अधिकार अधिनियम, २००५ शासन निर्णय

0 comment 6K views

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती शुल्क अर्जदारास कळविण्याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. साप्रवि-१२०२२/२८/२०२५-साप्रवि (माहिती / कार्या-६) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक : २९ डिसेंबर, २०२५

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ व त्याअंतर्गत नियमांनुसार माहिती पुरविताना आकारावयाचे शुल्क अर्जदारास कधी व कशा प्रकारे कळवावे, याबाबत शासनाने यापूर्वी संदर्भ क्र.१ येथिल दि. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. तथापि, राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या संदर्भक्र.२ येथील पत्रान्वये सदर परिपत्रकातील तरतुदी अधिनियमाशी सुसंगत नसल्याचे निदर्शनास आणून दिले असून अधिनियमातील तरतुदींप्रमाणे सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याची विनंती शासनास केलेली आहे.
२. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ७ (१) अन्वये जनमाहिती अधिकारी यांनी माहितीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या शिघ्रतेने आणि कोणत्याही परिस्थितीत विनंती केल्यापासुन ३० दिवसाच्या आत अर्जदारास माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच कलम ७ (३) (क) अन्वये अतिरीक्त फीबाबतची सुचना पाठविल्या नंतर उक्त सुचना पाठविल्याचा व फीचे प्रदान केल्याच्या दरम्यानचा कालावधी हा ३० दिवसाच्या कालावधीची परिगणना करण्याच्या प्रयोजनार्थ वगळण्याची तरतुद आहे. सदर तरतुदीनुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर ठराविक कालावधीत माहिती शुल्क कळविण्याची कोणतीही सक्ती नसून अधिनियमातील विहित कालमर्यादेत माहिती पुरविणे ही जन माहिती अधिकारी यांची मुख्य जबाबदारी आहे.
३.
उपरोक्त तरतुदीस अनुसरून शासन असे निर्देश देत आहे की, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जामध्ये, माहिती पुरविण्यासाठी शुल्क आकारावयाचे असल्यास, जन माहिती अधिकारी यांनी अधिनियमातील तरतुदींनुसार व प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती विचारात घेऊन माहितीची पृष्ठसंख्या व टपालखर्चासह माहितीच्या शुल्काची रक्कम टपालाने किंवा ई-मेलद्वारे शक्य तितक्या लवकर अर्जदारास कळवावी. तसेच माहिती उपलब्ध करून देण्याची संपूर्ण कार्यवाही अधिनियमातील विहित कालमर्यादेत पूर्ण होईल, याची दक्षता जन माहिती अधिकारी यांनी घ्यावी.

अर्धन्यायिक स्वरुपाच्या प्रशासकीय सुनावण्या घेण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा (ऑनलाईन सुनावणीचा) पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०२०/प्र.क्र.६२/१८ (र.व का.) मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय (विस्तार), मुंबई ४०० ०३२ दिनांक : १७ मे, २०२२.

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम ५(१) व ५(२) अन्वये जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी यांना जन माहिती अधिकारी तसेच कलम १९ (१) अन्वये अध्यक्ष, अपिलीय प्राधिकरण, मुंबई यांना अपिलीय प्राधिकारी म्हणून घोषित करणेबाबत…
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो), शासन परिपत्रक क्र. मग्रारो-२०१८/प्र.क्र.४२/रोहयो-६अ १६ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक : ११ जुलै, २०१८.

माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम ४ ची प्रभावी अंमलबजावणी सर्व सार्वजनिक प्राधीकरणांकडून होणेबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१८/प्र.क्र.६६/सहा, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दि. १३ एप्रिल, २०१८

Online R.T.I व्दारे प्राप्त झालेले अर्ज विहित कालावधित निकाली काढण्यासंदर्भात.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण २०१६/प्र.क्र.१६१/२०१६/सहा. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दि. २०.१०.२०१६

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे कार्यालयात जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी पदनिर्देशित करणेबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र. तक्रार-२६१५/१४५०/प्र.क्र.२९९/२१ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : १३ ऑक्टोबर, २०१६.

पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.

माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४(१) (अ) (बी) च्या अंमल बजावणीबाबत
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण २०१५/प्र.क्र. (४७/१५) सहा. मंत्रालय, मुंबई – ४००० ३२. दिनांक- ५.५.२०१५.

माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अंमल बजावणीबाबत
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण 2015/प्र.क्र. (247/15) सहा. मंत्रालय, मुंबई – 4000 32. दिनांक- 29.4.2015.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ एप्रिल २०१३ अधिसूचना

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २०, २०१२ एक विनंती अर्ज केवळ एका विषयाशी संबंधित असणे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, 31-01-2012 “अभिलेख तपासण्याकरिता त्याची मागणी करण्याची कार्यपद्धती

पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरणांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व सार्वजनिक प्राधिकरणांची सची तयार करणेबाबत. ,सा प्र वि महाराष्ट्र शासन, दिनांक १८/०९/२००९.

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील कलम १९(१) अन्वये प्रथम अपिलीय अधिकारी यांनी त्यांचेकडे प्रांप्त होणारे सर्व अपीले विहित मुदतीत निकालात काढणेबाबत.
महाराष्ट्र शासन शासन परिपत्रक क्र. कॅमाअ-२००७/११८२/प्र.क्र. ६५/०७/६ (मा.अ.) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक : १२ डिसेंबर, २००७

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ शासकीय पुस्तक मिळविण्या साठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

305440

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions