Friday, November 27, 2026
Friday, November 27, 2026
Home » प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता AS, TS- Administrative Approval And Technical Approval

प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता AS, TS- Administrative Approval And Technical Approval

0 comment 7.4K views

तांत्रिक मान्यता प्रदान करताना प्रशासकीय मान्यतेतील सर्व बाबी पूर्ण व्याप्तीसह अंतर्भूत करणेबाबत मार्गदर्शक सूचना. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन परिपत्रक क्रमांक : बीडीजी-२०२६/प्र.क्र.१३८/इमा-२ मादान कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनां: २६ ऑफ्टोबर, २०२६

१. इमारत बांधकामांना प्रशासकीय मान्यतेतील मंजूर किमतीपेक्षा अधिक किमतीची अथवा अपूर्ण व्याप्तीची तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात येऊ नये.
२. प्रशासकीय मान्यतेतील काही बाबी वगळून, उर्वरित बाबींचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेच्या मंजूर किमतीत बसविण्याच्या उद्देशाने तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात येऊ नये. परिणामी प्रकल्पाची अंतिम किंमत प्रमाणाबाहेर वाढते. तसेच, कामाची बहुतांश व्याप्ती पूर्ण झाल्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर सादर केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे इमारतीचा विहित वेळेत
वापर होऊ शकत नाही आणि शासकीय निधीचे योग्य नियोजनही होत नाही.
३. तांत्रिक मान्यतेसाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकाची किंमत प्रशासकीय मान्यतेच्या मंजूर किमतीपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आल्यास, सदर बाब तात्काळ शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.
तसेच, मूळ प्रशासकीय मान्यता रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करून नवीन प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात यावा. अशा प्रकरणांमध्ये नवीन प्रशासकीय मान्यता प्राप्त होईपर्यंत अपूर्ण कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊ नये. ४. मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी निरीक्षण टिपणी निर्गमित करताना विनिर्देशांमधील बदल (Changes in Specifications), प्रमाण किंवा कामाची व्याप्ती यात बदल करताना कामाच्या मंजूर प्रशासकीय मान्यतेपेक्षा अधिक खर्च होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सदर बदल करणे आवश्यक असल्यास त्याबाबत संबंधित उपभोक्ता विभागाचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव यांची लेखी मान्यता घेण्यात यावी.
५. प्रशासकीय मान्यतेच्या किमतीत व्याप्ती पुर्णपणे संपून काम हस्तांतरित होईल, अशी खात्री करण्याची जबाबदारी तांत्रिक मान्यता प्रदान करणाऱ्या अधिकाऱ्याची राहील.
उपरोक्त नमूद सूचनांचे तांत्रिक व आर्थिक शिस्तीच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे. सदर सूचनांचे उल्लंघन करून सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव मंजुरीस्तव शासनास प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधीतांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF दिनांफ: २६ ऑफ्टोबर, २०२६ वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

नवीन नागरी कामांना प्रशासकीय मान्यता किंवा सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत..वित्त विभाग21-07-2026

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यामधील बांधकामे, विकास कामे योजना यांच्याशी संबधित प्रशाकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा, कंत्राट स्वीकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०८-१०-२०२१

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता निविदा स्विकृती अधिकारात वाढ शासन निर्णय दिनांक 21 सप्टेंबर 2021

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यामधील बांधकामे, विकास कामे योजना यांच्याशी संबधित प्रशाकीय व तांत्रिक मान्यता आणि निविदा, कंत्राट स्वीकारण्याच्या अधिकारात वाढ करण्याबाबत प्रशासकीय -तांत्रिक मान्यता -निविदा-स्विकृती-अधिकारात-वाढ–शासन निर्णय दिनांक 06-सप्टेंबर-2021

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता शासन निर्णय दिनांक 1 मार्च 2018

पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.

प्रशासकीय व तांत्रिक मान्यता शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2017 अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

अटी:-
१) विकास योजनेला तांत्रिक मान्यता देण्यासाठी जि.प. सभेला शिफारस करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत करण्यात यावी. सदर समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, योजना राबविणाऱ्या विभागाचे खाते प्रमुख व आवश्यकतेनुसार संबंधित विषयाच्या तज्ञ व्यक्तिस निमंत्रित करावे.
२) महाराष्ट्र जिल्हा परिषदां व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्य (कलम १००) अन्वये पहिल्या अनुसूचीतील कामांचे विषय (विकास विषयक कार्यासह) घेण्यात यावेत.
३) असे करताना प्रचलित शासन निर्णयाचे पालन व्हावे. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

प्रशासकीय मान्यता मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दिनांक 5 जून 2015 अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

प्रशासकीय मान्यता देताना घ्यावयाची दक्षता.
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांकः विअप्र-२०१४/प्रक्र.४९/१४/विनियम मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय मुंबई- ४०० ०३२. तारीखः ५ जानेवारी २०१५.

सर्वसाधारण जिल्हा निधी अर्थ संकल्पीत करणे वितरीत करणे या या निधीतील कामांना प्रशाकीय मान्यता देणे बाबतची सुधारीत कार्यपद्धती नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक १६-०२-२००८ अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment