महाराष्ट्र शासन महसूल विभाग शासन परिपत्रक क्रमांक मुद्रांक २०२६/ प्र.क्र. ३८०/ मुद्रांक-२ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग मंत्रालय, मुंबई ४०००३२ दिनांक :- १९ ऑक्टोबर, २०२६
१.सामाईक नावे असलेल्या ७/१२ जमिनीच्या सहहिस्सेदारांपैकी ज्या सहहिस्सेदारास त्याच्या हिस्साचा भाग विक्री करावयाचा असल्यास त्या विक्री करावयाच्या भागाची विक्री करणान्या सहहिस्सेदाराने भूमीअभिलेख विभागाकडून प्राप्त झालेली मोजणीची क प्रत दस्तासोबत जोडलेली असल्यास सामाईक नावे असलेल्या ७/१२ वरील इतर सहहिस्सेदारांची लेखी संमती किंवा ना- हरकत प्रमाणपत्राची मागणी न करता दुय्यम निबंधकांनी सादर केलेल्या दस्तांची नोंदणी करण्यात यावी.
अधिक माहितीसाठी दिनांक :- १९ ऑक्टोबर, २०२६ pdf download करून माहिती मिळवून घ्यावी.
२. सामाईक नावे असलेल्या ७/१२ जमिनीच्या सहहिस्सेदारांपैकी ज्या सहहिस्सेदारास त्याच्या हिस्साचा भाग विक्री करावयाचा असल्यास त्या विक्री करावयाच्या भागाची विक्री करणान्या सहहिस्सेदाराने भूमीअभिलेख विभागाकडून मोजणीची क प्रत उपलब्ध करुन न दिल्यास किंवा दस्तासोबत न जोडल्यास सामाईक नावे असलेल्या ७/१२ वरील इतर सहहिस्सेदारांची लेखी संमतीशिवाय किंवा ना- हरकत प्रमाणपत्राशिवाय दुय्यम निबंधकांनी सादर केलेल्या दस्तांची नोंदणी करण्यात येऊ नये म्हणजेच नोंदणीकरिता दाखल होणाऱ्या दस्तांमधील सामाईकरित्या धारण केलेल्या मिळकतीमधील सहहिस्सेदारांची लेखी संमती घेवून ती दस्ताचा भाग करणे अनिवार्य आहे. सह हिस्सेदारांची लेखी संमती दस्तासोबत जोडली नसल्यास सदर दस्ताची
नोंदणी होणार नाही.

#gayran #gurucharan #government land #distributionofgovernmentland #busampadan #inamjamin #jamin #devsthan jamin #ngoland #bhogavata1 #bhogvata2 #gunthevari #inamvatan #jaminmagani #kabjehakka #maharashtramahsulact #najrana #atikraman #Encrochment #gharkul #atikraman
या संकेतस्थळावरील Contact Form / Feedback Form वापरू शकता.आपल्याला येथील माहिती उपयुक्त वाटल्यास ही वेबसाइट आपल्या सहकारी, मित्रपरिवार आणि संबंधित व्यक्तींसोबत शेअर करू शकता
-
3.5K
Leave a Reply