महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: संभाव्य दुष्काळ परिस्थीतीत चारा टंचाईवर उपाययोजना – MREGS: Measures to address fodder shortages in potential drought conditions
उपरोक्त संदर्भाधीन दिनांक ०७.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र.५ खालीलप्रमाणे आहे.
सविस्तर व अधिकृत माहितीसाठी वरील दिनांक : ०९ जुलै, २०२४,दिनांक : ०७ जून, २०२४ pdf डाउनलोड करून माहिती मिळवून घ्यावी
“सदर कामांकरिता वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृपी विभाग इत्यादि विभाग कार्यान्वयीन यंत्रणा राहतील. इतर विभागांना त्यांच्या विभागांच्या योजनांशी संबंधीत कल्याणकारी योजना राबविताना या विभागाशी सल्ला मसलत करून प्रस्तुत चारा लागवडीची कामे करता येतील.”
या ऐवजी
सदर कामांकरिता वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृपी विभाग, ग्रामपंचायती इत्यादि विभाग कार्यान्वयीन यंत्रणा राहतील. इतर विभागांना त्यांच्या विभागांच्या योजनांशी संबंधीत कल्याणकारी योजना राबविताना या विभागाशी सल्ला मसलत करून प्रस्तुत चारा लागवडीची कामे करता येतील.
असे वाचावे.
शासन निर्णय :-
सविस्तर व अधिकृत माहितीसाठी वरील दिनांक : ०७ जून, २०२४ pdf डाउनलोड करून माहिती मिळवून घ्यावी
संभाव्य दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईवर उपाययोजना म्हणून गायरान/वैयक्तिक जमिनीवर राज्यातील एकूण ९ कृषी हवामान विभाग, विविध जमिनीचे प्रकार आणि सरासरी पर्जन्यमान यांचा विचार करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) चारा पिकांची लागवड करणेबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे.
2. अंजन, फॉक्सटेल गवत, यासारख्या गवतासोबतच मारवेल, मोशी, पवना, डोंगरी, दशरथ, दिनानाथ, गिनी, रानमुग (सिरॅट्रो), बेर इत्यादी विविध प्रकारची चारा पिके आणि त्याचबरोबर वैरण उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात यावी. (याबाबतची सविस्तर माहिती परिशिष्ट-अ (गवती रानात लागवडी योग्य गवतांची माहिती) व परिशिष्ट-ब (वैरण उपयुक्त वृक्षांची यादी) सोबत जोडण्यात येत आहे.
केंद्र शासन प्रत्येक वर्षी राज्याकरिता अकुशल मजूरीचा दर निश्चित करीत असते. केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दि.२७.०३.२०२४ च्या अधिसूचनेद्वारे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत हा दर रूपये २९७/- प्रतिदिन इतका महाराष्ट्र राज्यासाठी निश्चित केलेला आहे. सदर मजूरी दर दिनांक ०१ एप्रिल, २०२४ पासून लागू करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार गायरान/वैयक्तिक जमिनीवर चारा लागवड करण्याकरिता अकुशल मजुरांना उपरोक्त अधिसूचनेमधील दर अनुज्ञेय राहील.
तसेच केंद्रशासनामार्फत वेळोवेळी सुधारीत करण्यात येणाऱ्या मजूरी दराप्रमाणे सुधारीत अंदाजपत्रक देखील तयार करण्यात येईल.
प्रस्तूत शासन निर्णयास अनुसरून चारा पिकांची लागवडीची कामे हाती घेण्यात यावीत.
सदर कामांकरिता वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग इत्यादी विभाग कार्यान्वयीन यंत्रणा राहतील. इतर विभागांना त्यांच्या विभागातील योजनांशी संबंधित कल्याणकारी योजना राबविताना या विभागाशी सल्ला मसलत करून प्रस्तुत चारा लागवडीची कामे करता येतील.
सदर कार्यक्रम राबविताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सदर कामांसाठी निधी उपलब्ध होणार असल्यामुळे या योजनेच्या आर्थिक निकषांचे पालन करणे आवश्यक आहे. चारा पिकांच्या लागवडीच्या कामांचे तात्काळ पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी संबंधित आधिकान्यांची राहील.
चारापिकांसाठी वृक्ष लागवड दि. ३०/०३/२०२२ शासन निर्णयानुसार अनुज्ञेय राहील.
चारापिकांसाठी गवत लागवड करण्यासंदर्भात अंदाजपत्रके स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
Estimate Format
#MREGS #VBGRMG #mukhymantrisamrudhiabhiyan #mspa #governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #DIVABATTI TAX #FACTORY TAX #Government Decision #Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees #GRAMPANCHAYAT KAR AKARNI, #GRAMPANCHAYAT TAXES #KARKAHANA TAX #Maharashtra Government #MAJI SANIK TAX #MIDC #MIDC TAX #MOBILE TOWER TAX #PAVAN CHAKKI TAX #PROPERTY TAX #SANIK VIDHVA TAX, #SANITARY TAX #SOLAR PROJECT TAX #TAX FREE #taxation-at-industrial-rate #Encrochment #gharkul #Pandit dindayal upadhay gharkul #atikraman #permision #building #construct #Maharashtra Regional and Urban Planning Act

htps://gramvikaseseva.com/mregs-social-audit/
या संकेतस्थळावरील Contact Form / Feedback Form वापरू शकता.आपल्याला येथील माहिती उपयुक्त वाटल्यास ही वेबसाइट आपल्या सहकारी, मित्रपरिवार आणि संबंधित व्यक्तींसोबत शेअर करू शकता
Leave a Reply