Thursday, November 12, 2026
Thursday, November 12, 2026
Home » ग्रामपंचायत वीजबिल: Grampanchayat Lightbill

ग्रामपंचायत वीजबिल: Grampanchayat Lightbill

8 comments 6.1K views

१५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून पथ दिव्याची वीज देयक आणि पाणी पुरवठा योजनाची वीज देयके अदा करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २३-०६-२०२१

१. सर्व प्रथम पथ दिव्यांची विद्युत देयके आणि पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके अदा करून १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित आणि अबंधित निधीतून इतर खर्च नंतर करावा.
२. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सौर उर्जेवर भर देऊन त्याचा वापर करण्यास प्राधान्य दयावे. जेणेकरून भविष्यामध्ये विद्युत देयकांची रक्कम कमी होईल.
३. व्यवस्थित लेखांकन होण्याच्या दृष्टीने व घटनात्मक दुरूस्तीच्या अनुषंगाने त्या त्या ग्रामपंचायतीने १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून (अनटाइड) पथ दिव्यांची वीज देयके आणि बंधित अनुदानातून (टाइड) पाणी पुरवठा योजनांची वीज देयके ग्रामपंचायत स्तरावरच अदा केली जाईल.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.

सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे ग्राहकांच्या थकीत वीज देयकांबाबत उद्योग,उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दिनांक १६-०५-२०१८

१. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीकडील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिवे यावरील महावितरण कंपनीच्या ३१ मार्च, २०१८ पर्यंतच्या थकीत बिलाच्या रकमांपैकी (दंड व व्याज कमी करुन) ५०% रक्कम वित्त आयोगाच्या अनुदानातून नगर विकास विभागाने परस्पर महावितरण कंपनीकडे वळत्या कराव्यात व उर्वरित ५०% रक्कम संबंधित मनपा/नगरपालिका / नगरपंचायतीकडून महावितरण कंपनीने वसूल करावी. आवश्यकता वाटल्यास महावितरण कंपनीने सदरची रक्कम भरण्यासाठी त्यांना सुलभ हप्ते करुन द्यावेत.
२. जिल्हा परिषद / महाराष्ट्र जीवन प्राधिकरण / ग्रामपंचायत कडील पाणीपुरवठा वीज थकबाकीच्या ३१ मार्च, २०१८ पर्यंतच्या थकीत बिलाच्या रकमेपैकी (दंड व व्याज कमी करुन) ५०% रक्कम वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामविकास विभागाने महावितरण कंपनीस थेट अदा करावी. उर्वरित ५०% रक्कम संबंधित जिल्हा परिषद / महाराष्ट्र जीवन प्राधिकरण / ग्रामपंचायत यांनी महावितरण कंपनीकडे भरावी. त्याकरिता आवश्यक वीजेच्या बिलाच्या रकमेचे सुलभ हप्ते योजना महावितरण कंपनीने करावी.
३. ग्रामपंचायतकडील पथदिव्यावरील वीज थकबाकीच्या दिनांक ३१ मार्च, २०१८ पर्यंतच्या रकमा (दंड व व्याज कमी करुन) ग्राम विकास विभागाने महावितरण कंपनीकडे जमा करावी, ग्राम विकास विभागाने याकरिता वित्त आयोगाच्या अनुदानाचा ५०% वापर करावा.
४. दि.३१.०३.२०१८ पूर्वी जे पथदिवे ग्रामपंचायत भागात आहेत त्या पथदिव्यांची पुढील वीज देयकाची रक्कम ग्रामविकास विभागाने महावितरण कंपनीकडे, शासन अनुदान किंवा वित्त आयोगाच्या अनुदानातून भरणा करावी. दि.३१.०३.२०१८ नंतरच्या आस्थापित झालेल्या पथदिव्यांच्या वीज देयकांची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींकडून महावितरण कंपनीस अदा करण्यात यावी. नवीन पथदिव्याकरिता वेगळे मीटर लावण्यात यावेत.
५. ज्या ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा निधी वितरित झाला असेल, त्या ग्रामपंचायतींना नळ योजनांच्या थकीत वीज बिलांची रक्कम वित्त आयोगाच्या रक्कमेतून महावितरण कंपनीकडे भरण्यास परवानगी देण्यात येत आहे.
६. ज्या नगरपंचायत / नगरपरिषद / नगरपालिका/ महानगरपालिकेला वित्त आयोगाचा निधी वितरित झाला असेल, अशा नगरपंचायत/नगरपरिषद / नगरपालिका/ महानगरपालिकेला पथदिवे व नळ योजनांची बिले वित्त आयोगाच्या रक्कमेतून महावितरण कंपनीकडे भरण्यास परवानगी देण्यात येत आहे.
७. दि.३१.०३.२०१८ नंतरच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना / प्रादेशिक योजना यांच्या वीज देयकांची रक्कम संबंधित ग्रामपंचायत / जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी महावितरणकडे नियमित भरावी. तसेच दि. ३१.०३.२०१८ नंतरच्या नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यांच्या वीज देयकांची रक्कम महावितरणकडे नियमितपणे भरण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांची राहील.
८. ग्रामपंचायतीच्या दिवाबत्ती व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची वीज देयके भागविण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय VPM-२०८५/८.२.१९४०/२२, दि.३०.०१.१९९० मध्ये उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने उचित सुधारणा ग्राम विकास विभागाने तात्काळ करावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

#mukhymantrisamrudhiabhiyan #mspa #governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #DIVABATTI TAX #FACTORY TAX #Government Decision #Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees #GRAMPANCHAYAT KAR AKARNI, #GRAMPANCHAYAT TAXES #KARKAHANA TAX #Maharashtra Government #MAJI SANIK TAX #MIDC #MIDC TAX #MOBILE TOWER TAX #PAVAN CHAKKI TAX #PROPERTY TAX #SANIK VIDHVA TAX, #SANITARY TAX #SOLAR PROJECT TAX #TAX FREE #taxation-at-industrial-rate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

8 comments

ग्रामपंचायत कर व फी आकारणी Ι Gram Panchayat Taxes and Fees - ग्रामविकास E-सेवा October 12, 2026 - 8:30 am

[…] ग्रामपंचायत कर व फी आकारणी Ι Gram Panchayat… ग्रामपंचायत वीजबिल: Grampanchayat Lightbill प्रशासक- Prashasak मुख्यमंत्री समृद्ध […]

Reply
औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनार्थ ग्रामपंचायतींकडून ना हरकत प्रमाणपत्र देणेबाबत- Noc-Regarding the issua October 12, 2026 - 8:32 am

[…] ग्रामपंचायत कर व फी आकारणी Ι Gram Panchayat… ग्रामपंचायत वीजबिल: Grampanchayat Lightbill प्रशासक- Prashasak मुख्यमंत्री समृद्ध […]

Reply
स्थावर मालमत्ता: मुद्रांक शुल्क आकारणी - ग्रामविकास E-सेवा October 12, 2026 - 8:33 am

[…] ग्रामपंचायत कर व फी आकारणी Ι Gram Panchayat… ग्रामपंचायत वीजबिल: Grampanchayat Lightbill प्रशासक- Prashasak मुख्यमंत्री समृद्ध […]

Reply
ग्रामपंचायत हद्दीतील सौरउर्जा : प्रकल्प कर आकारणी - ग्रामविकास E-सेवा October 12, 2026 - 8:35 am

[…] ग्रामपंचायत कर व फी आकारणी Ι Gram Panchayat… ग्रामपंचायत वीजबिल: Grampanchayat Lightbill प्रशासक- Prashasak मुख्यमंत्री समृद्ध […]

Reply
टॉवर कर - ग्रामविकास E-सेवा October 12, 2026 - 8:36 am

[…] ग्रामपंचायत कर व फी आकारणी Ι Gram Panchayat… ग्रामपंचायत वीजबिल: Grampanchayat Lightbill प्रशासक- Prashasak मुख्यमंत्री समृद्ध […]

Reply
आदरातिथ्य क्षेत्र: औद्योगिक दराने कर आकारणी:Taxation at Industrial Rates - ग्रामविकास E-सेवा October 12, 2026 - 8:52 am

[…] ग्रामपंचायत कर व फी आकारणी Ι Gram Panchayat… ग्रामपंचायत वीजबिल: Grampanchayat Lightbill प्रशासक- Prashasak मुख्यमंत्री समृद्ध […]

Reply
शासकिय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध Ι Encrochment on Government Land - ग्रामविकास E-सेवा October 12, 2026 - 10:47 am

[…] ग्रामपंचायत कर व फी आकारणी Ι Gram Panchayat… ग्रामपंचायत वीजबिल: Grampanchayat Lightbill प्रशासक- Prashasak मुख्यमंत्री समृद्ध […]

Reply
ग्रामपंचायतींची निर्मीती-विभाजन Ι Formation and Division of Gram Panchayats - ग्रामविकास E-सेवा October 12, 2026 - 10:54 am

[…] ग्रामपंचायत कर व फी आकारणी Ι Gram Panchayat… ग्रामपंचायत वीजबिल: Grampanchayat Lightbill ताज्या घडामोडी […]

Reply

Leave a Comment