शासकीय ,स्थानिक स्वराज संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक, उच्य माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवडश्रेणी आवश्यक प्रशिक्षणाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २२-१०-२०२१
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना द्विस्तरीय व त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी दि.२० जुलै, २०२१ शासन निर्णयामधील सुधारित प्रशिक्षणाची अट शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना लागू राहील.
२. दि.२० जुलै, २०२१ च्या शासन निर्णयामधील अ.क्र.१ ते ६ येथील अटी जशाच्या तशा शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी पूर्ण करणे आवश्यक राहील.
अधिक माहिती साठी शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक, उच्य माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील लागू करण्यात आलेल्या त्रिस्तस्तरिय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने प्रिशिक्षण देणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २०-०७-२०२१
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना व मुख्याध्यापकांना द्वि-स्तरीय / त्रिस्तरीय वेतनश्रेणी :- राज्यातील सर्व अनुदानित अशासकीय खाजगी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, तांत्रिक शाळांमधील विद्याविषयक शिक्षक व अध्यापक विद्यालये यामधील शासन निर्णय क्रमांकः शिप्रधो २०१९/प्र.क्र. ४३/प्रशिक्षण शिक्षकांना दिनांक १ जानेवारी, १९८६ पासून केंद्र शासनाच्या धर्तीवर त्रि-स्तरीय वेतनरचना मंजूर करण्याच्या निर्णयानुसार विविध संवर्गात मूळश्रेणी, वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी संबधित प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे राहील. यापुढे माध्यमिक शाळेतील मुख्याध्यपकांचा एकच प्रवर्ग राहील व त्यांना १२ वर्षांच्या त्या पदांवरील अर्हताकारी सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी मिळेल
अधिक माहिती साठी शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.