अ) जलसंपदा विभागाच्या महामंडळांतर्गत असलेल्या कामासांठी १. महामंडळांतर्गत स्वीकारण्यात येणाऱ्या कार्यकंत्राट सेवांसाठी संदर्भ क्र. १० व ११ मधील अधिसूचनेनूसार दिनांक १ जानेवारी २०२२ पासून वस्तु व सेवा कराचा दर १८ टक्के घेण्यात यावा. २. संदर्भ क्र.१० व ११ मधील अधिसूचनेसार महामंडळांतर्गत स्वीकारण्यात येणाऱ्या कार्यकंत्राट सेवांसाठी वस्तु व सेवा कराच्या दरामध्ये दिनांक १ जानेवारी २०२२ पासून बदल करण्यात आला आहे. त्यामुळे दि.१ जानेवारी २०२२ रोजी चालू असलेल्या कामासाठीचे देयक अदा करताना वस्तु व सेवा कर अधिनियम २०१७ मधील कलम १४ नुसार कार्यवाही करण्यात यावी. ३. कंत्राटदारास देयके अदा केल्यानंतर वस्तु व सेवा कराची प्रतिपूर्ती (reimbursement) संदर्भ क्र.४ मधील शासन परिपत्रकातील नमूद सुचनांनूसार करण्यात यावी. वस्तू व सेवा कराच्या करभिन्नतेमुळे वस्तू व सेवा कराचा निम्न दर असताना कार्यकंत्राटदाराने जर उच्च दराने रक्कम वस्तू व सेवा कर विभागास भरुन त्याची प्रतिपूर्ती (reimbursement) महामंडळाकडून प्राप्त केली व तद्नंतर अशा निम्नदर व उच्च दरातील फरकाचा परतावा (refund) वस्तू व सेवा कर विभागाकडून प्राप्त केल्यास उक्त फरकाची रक्कम ही अतिप्रदान समजून महामंडळास परत करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील. यासाठीचे आवश्यक बंधपत्र कंत्राटदाराकडून घेण्यात यावे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अ) नवीन कामांची अंदाजपत्रके: दि.१९/०९/२०१७ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये नवीन अंदाजपत्रके तयार करताना प्रचलित वस्तु व सेवा कराच्या दरानुसार अंदाजपत्रके तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरुन आता नवीन अंदाजपत्रके तयार करतांना वस्तु व सेवा कर १८% घेण्यात यावा.
ब) चालू कामांची देयके :- सद्यस्थितीत चालू असलेल्या ज्या कामांच्या निविदा व वस्तु व सेवा कर
वगळून मागविण्यात आलेल्या आहेत, अशा कामांची देयके १२% वस्तु व सेवाकर परिगणित करुन अदा करण्यात येतात. आता अशा चालू कामांची देयके निविदा अटी व शर्तीच्या अधिन राहून बदललेल्या १८% वस्तु व सेवाकरांनुसार देयके पारित करावीत.
ज्या चालू कामांच्या निविदा वस्तु व सेवाकरासह मागविण्यात आलेल्या आहेत, अशा कामांसाठी देयके पारित करीत असतांना बदललेल्या १८% वस्तु व सेवाकर विचारात घेऊन निविदा अटी व शर्तीनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….