61
महाराष्ट्र कोषागार नियम, खंड २, परिशिष्ट -१२ अन्यये विहित केलेल्या अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यात सुधारणा करणेबाबत.
शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १०११/सं.क्र. १७/कोषा-प्र-५ दिनांक : १६ जुलै, २०११.
महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८, खंड १ मधील नियम २३४ नुसार सादर करावयाचे अंतिम वेतन प्रमाणपत्राचा नमुना म. को. नि. खंड २ मधील परिशिष्ट १२ नुसार विहित करण्यात आलेला आहे.
सदर नमुन्यामध्ये कर्मचाऱ्याला केलेल्या अंतिम वेतन तसेच इतर अनुषंगीक प्रदाने /वसुलीबाबतची माहिती दर्शविण्यात आलेली आहे. परंतु, गेल्या काही वर्षात नव्याने अस्तित्यात आलेल्या योजनांची माहिती नमूद करण्याची सोय सदर नमुन्यात करणे आवश्यक आहे. तसेच सदर नमुन्यामध्ये नैमित्तिक रजा, कर्मचाऱ्याने परत न केलेली प्रकाशने व जड़ संग्रह वस्तु इत्यादी बाबतची माहिती समाविष्ट नाही. सदर माहिती प्राप्त होण्याच्या दृष्टीने अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :- महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८, खंड १ मधील नियम २३४ नुसार सादर करावयाचे अंतिम वेतन प्रमाणपत्राचा म. को. नि. खंड २ मधील परिशिष्ट १२ नुसार विहित करण्यात आलेल्या सध्याच्या नमुन्यामध्ये सुधारणा करण्यात येत असून सदर नमुना सोबत जोडलेल्या "परिशिष्ट अ" प्रमाणे असेल.
अंतिम वेतन प्रमाणपत्राचा परिशिष्ट 'अ' प्रमाणे नमुना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू झाला असे समजण्यात यावे.
You Might Be Interested In