वाहन चालक अतिकलिक भत्ता
शासन आता असे आदेश देत आहे की, शासनाचे विविध विभाग व त्याखालील निरनिराळ्या कार्यालयातील वाहन चालकांना ९ तास ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास खालील शर्तीच्या अधिन राहून रु.१००/- प्रति त्तास या दराने अतिकालिक भत्ता देण्यात येईल. १) कामाच्या दिवशी ९ तास ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास (मोजन समय धरुन) आणि रविवार व सुटीच्या दिवशी सुद्धा काम केल्यास दर तासाला रु. १००/- (अर्धा तास किंवा जास्त काम केल्यास तो पूर्ण तास धरण्यात येईल.) २) वाहन चालकास एका महिन्यात मिळणारी अतिकालिक भत्त्याची एकूण रक्कम त्याच्या एकूण पगाराच्या (Salary) ३०% पेक्षा जास्त असू नये. २. बाहन चालकांना सुधारित दराप्रमाणे अतिकालिक मत्ता मंजूर करण्याबाबतचे अधिकार पूर्वीप्रमाणेच वाहन चालक ज्यांचे नियंत्रणाखाली काम करतात, त्या विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांना राहतील. शासन निर्णय क्रमांका अकाम-२०२२/प्र.क्र.०७/सेवा-६ ३. हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील. ४. सुधारित दराप्रमाणे येणारा खर्च संबंधित विभागाच्या/कार्यालयाच्या त्या त्या लेखाशीर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
संगणक सांकेतांक क्रमांक २०२३०८०७१४४४०४७८०५
-
2.3K
-
883
-
77
-
287
-
144
-
272
-
439
-
221
-
174