सुधारणा अध्यादेश 2024.
महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ 15-10-2024
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७
अधिसूचना महसूल व वन विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ जुलै, २०२३.
प्रारूप नियम
१. या नियमांस, मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत (सुधारणा) नियम, २०२३, असे म्हणावे.
२. मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम, १९५९ (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य नियम” असा केला आहे), याच्या नियम १ मधील, “मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम, १९५९” या मजकुराऐवजी “महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम” हा मजकूर दाखल करण्यात येईल.
(१)महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जुले १४, २०२३/आषाढ २३, शके १९४५
३. मुख्य नियमांच्या नियम ३ मधील;
(क) खंड (क) नंतर पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :-
“(क-१) “शेत रस्ता” याचा अर्थ मुख्यत्वेकरुन, शेतीच्या कामासाठी वापराला जाणारा रस्ता, असा आहे,”
“(ख) खंड (ग) नंतर पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :-
“(ग-१) “विहिर (कूप)” याचा अर्थ, व्यक्ती किंवा व्यक्तींद्वारे भूजलाचा शोध किंवा निष्कासन (निष्कर्षण) करण्यासाठी खणलेली विहीर, असा आहे आणि शास्त्रीय अन्वेषण, समन्वेषण, आवर्धन, संधारण, संरक्षण किंवा भूजल व्यवस्थापन पार पाडण्यासाठी केंद्र सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेली अनुखणित संरचना वगळून, उघडी विहीर, खोदलेली विहीर, कूप नलिका, खोदलेली-नि-कूप नालिका, नलिका कूप, गाळणी केंद्र, संग्राही विहीर, पाझर बोगदा, पुनर्भरण विहीर, निष्कासित विहीर किंवा कोणत्याही प्रकारे संयुक्तकरण किंवा बदल यांचा त्यात समावेश होतो;”.
४. मुख्य नियमाच्या, नियम २७ मध्ये, –
(१) पोट-नियम (१) मधील “कलम ३१ चा खंड (क)” या मजकुराऐवजी ” कलम ३१ च्या पोट-कलम (१) चा खंड (क)” हा मजकूर दाखल करण्यात येईल.
(२) पोट-नियम (२) ऐवजी पुढील पोट-नियम दाखल करण्यात येतील :-
“(२) पोट-नियम (१) अन्वये अर्ज प्राप्त झाल्यावर, जिल्हाधिकारी, संबंधित कुळवहीवाट कायदा आणि महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ (१९६१ चा महा. अधिनियम क्रमांक २८) (जोपर्यंत शेत जमिनीच्या हस्तांतरणावर प्रतिबंध घालण्यासंबधात अशा तरतुदी असतील तोपर्यंत) याच्या तरतुदींना अधीन राहून आणि या नियमात विहित केलेल्या शर्तीस अधीन कब्जा असलेल्या किंवा यथास्थितीत त्याचा भाग असलेल्या क्षेत्रास मंजुरी देईल,
(क) जर विहीरीकरिता जमिनीची आवश्यकता असेल तर;
(ख) जर शेत रस्ता याकरिता जमिनीची आवश्यकता असेल तर;
(ग) सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन किंवा थेट खरेदी केल्यानंतर शिल्लक राहिलेली लगतची शेतजमीन प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तर; किंवा