विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीच्या कार्यपध्दतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देत आहे.
१) जिल्हाधिकारी यांच्याकडून विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीसाठी यापुढे शासनास प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. जिल्हाधिकारी यांनी विशेष कार्यकारी अधिकारी या पदाच्या उमेदवाराकडून प्राप्त झालेले अर्ज व मा. पालकमंत्री यांच्याकडून प्राप्त झालेली शिफारस लक्षात घेऊन त्यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करावे.
२) विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीसाठी संदर्भाधीन दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ च्या शासन निर्णयान्वये परिशिष्ट १ मधील उमेदवाराची माहिती व प्रतिज्ञापत्र या संदर्भात पोलिस पडताळणीस बराच कालावधी लागत असल्याने विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीस विलंब होत असतो. त्या अनुषंगाने विशेष कार्यकारी अधिकारी या पदासाठी उमेदवारांकडून प्राप्त झालेले अर्ज व मा. पालकमंत्री यांच्याकडून शिफारस प्राप्त करताना जिल्हाधिकारी यांनी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट १ (अ) नुसार उमेदवाराचे स्वयः घोषणापत्र प्रथमः घेण्यात यावे.
३) जिल्हाधिकारी यांच्याकडून स्वयः घोषणापत्राच्या आधारे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केल्यानंतर नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी यांची पोलिस पडताळणी ही संदर्भाधीन दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ च्या शासन निर्णयान्वये परिशिष्ट १ मधील माहिती व प्रतिज्ञापत्रानुसार पुढील सहा महिन्यांत करुन घेणे बंधनकारक राहील.
४) जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या पोलिस पडताळणीचे प्रस्ताव पोलिस अधिक्षक/पोलिस आयुक्त यांच्याकडून सहा महिन्याच्या आत संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पडताळणी करून पाठवणे बंधनकारक राहील.
५) जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी यांचे पोलिस पडताळणी अहवाल नकारात्मक प्राप्त झाल्यास संबंधितांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ रद्द करुन त्यांच्यावर चुकीचे स्वयंः घोषणापत्र व परिशिष्ट १ (अ) मधील माहिती व प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल नियमोचित कार्यवाही त्वरीत करावी.
२. वरील सुधारणा व्यतिरिक्त शासन निर्णय दिनांक ३१ डिसेंबर, २०१५ आणि पूरकपत्र दिनांक १५ मार्च, २०१६ मधील इतर तरतुदी व निकष लागू राहतील.
सांकेतांक २०२३०५२४१६२६२९८८०७अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
२. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी निकष:- २.१ संबंधित व्यक्तीचे वय विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करावयाच्या कॅलेंडर वर्षाच्या १ जानेवारी रोजी २५ वर्षांपेक्षा कमी नसावे व ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. २.२ संबंधित व्यक्ती “किमान दहावी (एस.एस.सी.) किंवा तत्सम परीक्षा” किंवा “जुनी एस.एस.सी. (११वी) परीक्षा उत्तीर्ण असावी. २.३ संबंधित व्यक्तीचे महाराष्ट्रातील सलग वास्तव्य, त्याची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करावयाच्या कॅलेंडर वर्षाच्या १ जानेवारीच्या लगतपूर्वी किमान १५ वर्षे असावे. २.४ संबंधित व्यक्तीला फौजदारी गुन्हयाखाली शिक्षा झालेली नसावी किंवा त्याच्याविरुध्द गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंदविलेला नसावा किंवा कोणत्याही न्यायालयाने त्यास नादार (bankrupt) जाहीर केलेले नसावे. मात्र सामाजिक चळवळींसंदर्भात दाखल झालेल्या सौम्य गुन्हयांसाठी अर्जदारास अपात्र ठरवू नये. ..कोणतीही व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस पात्र असेल. मात्र निकषांच्या पूर्ततेसाठी त्याची पुनर्पडताळणी होणे आवश्यक राहील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….