Sunday, November 22, 2026
Sunday, November 22, 2026
Home » राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी सामाजिक-धार्मिक संस्थांचे सदस्य-State-Government-Employees-And-Members-Of-Socio-Religious-Organizations

राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी सामाजिक-धार्मिक संस्थांचे सदस्य-State-Government-Employees-And-Members-Of-Socio-Religious-Organizations

0 comment 3.9K views

राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी सामाजिक-धार्मिक संस्थांचे सदस्य होणे.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९….
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: सीडीआर-१००९/प्र.क्र.८/०९/११, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : ७ जूलै, २००९.


ज्या सामाजिक- धार्मिक संस्थांच्या उद्दीष्टांमध्ये सामाजिक सुधारणा आणि धार्मिक जागृती करणे इत्यादी उद्देश असल्याचा दावा केला जातो. अशा सामाजिक- धार्मिक संस्थांचे सदस्य बनण्यासाठी शासकीय कर्मचारी पूर्व परवानगी मागतात, अशी उदाहरणे या विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहेत.
२. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १६ नुसार, सामाजिक किंवा धमांदाय स्वरुपाचे मानसेवी कार्य हाती घेण्यासाठी राज्य शासकीय कर्मचा-याला शासनाच्या पूर्वमंजूरीची आवश्यकता नसते. मात्र, शासनाकडून निदेश देण्यात आल्यास, त्याने असे कार्य बंद केले पाहिजे.
शासकीय कर्मचा-याला निवडणूकीने प्राप्त होणारे पद धारण करायचे असेल तेव्हाच फक्त अशा पूर्वपरवानगीची आवश्यकता असते. निव्वळ धार्मिक स्वरुपाच्या कार्यात सहभागी होण्याच्या बाबतीत, भारताच्या संविधानाने कोणत्याही धर्माचा अनुयायी म्हणविण्याचा आणि त्याचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य
असतांना, राष्ट्राचे धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान त्यांना मान्य नाही याबद्दलच्या समजुतीस कोणतीही जागा राहू नये म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनात तसे आचरण ठेवावे.
3. सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या ध्येयाचा दावा करणा-या काही संघटना आणि चळवळी सांप्रदायिक किंवा जातीय स्वरुपाच्या असू शकतात. म्हणून, ज्या संघटना व चळवळीचे कार्य, सांप्रदायिक किंवा जातीय स्वरुपाचे असल्याचा अर्थ लावला जाण्यास पात्र असेल अशा कोणत्याही संघटनेशी किंवा
चळवळीशी संबंध ठेवताना शासकीय कर्मचा-यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे इष्ट ठरेल. आक्षेपाह ध्येय आणि उद्दिष्टे असलेल्या अशा संघटनांची किंवा त्यांच्या कार्यांची एक परिपूर्ण यादी देणे शक्य होणार नाही.
कोणत्याही संघटनेत दाखल होण्याच्या आणि त्यांच्या कार्यामध्ये भाग घेण्याच्या निर्णयाच्या परिणामांना स्वतः कर्मचारीच जबाबदार असेल. म्हणून, ज्या संघटनेत किंवा संघात दाखल होण्याची शासकीय कर्मचा-याची इच्छा असेल, त्या संघटनेची कायें आणि उद्दिष्टे ही, वर्तणूक नियमांच्या कोणत्याही
तरतुदीखालील कारवाईस त्याला पात्र ठरवतील अशा स्वरुपाची नाहीत, याची स्वतः खात्री करणे हे त्या शासकीय कर्मचा-याचे कर्तव्य असेल. अशा परिस्थितीत, अशा संघटनांच्या कार्यातील सहभागासंबंधी शासनाच्या धोरणाबाबतच्या अनभिज्ञतेबद्दलची किंवा गैरसमजुतीबद्दलची कोणतीही सबब असमर्थनीय ठरेल.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे. पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.
  • राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी सामाजिक-धार्मिक संस्थांचे सदस्य-State-Government-Employees-And-Members-Of-Socio-Religious-Organizations

    राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी सामाजिक-धार्मिक संस्थांचे सदस्य-State-Government-Employees-And-Members-Of-Socio-Religious-Organizations

    राज्य शासनाच्या कर्मचा-यांनी सामाजिक-धार्मिक संस्थांचे सदस्य होणे.महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९….महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: सीडीआर-१००९/प्र.क्र.८/०९/११, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : ७ जूलै, २००९. ज्या सामाजिक- धार्मिक संस्थांच्या उद्दीष्टांमध्ये सामाजिक सुधारणा आणि धार्मिक जागृती करणे इत्यादी उद्देश असल्याचा दावा केला जातो. अशा सामाजिक- धार्मिक संस्थांचे सदस्य बनण्यासाठी शासकीय कर्मचारी पूर्व…


You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment