Sunday, November 22, 2026
Sunday, November 22, 2026
Home » जिल्हा परिषद वाहन देखाभाल, दुरुस्ती व दुरुस्ती-Zilla Parishad Vehicle Maintenance and Repair

जिल्हा परिषद वाहन देखाभाल, दुरुस्ती व दुरुस्ती-Zilla Parishad Vehicle Maintenance and Repair

0 comment 22 views

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यां कडील वाहनांची देखभाल व दुरुस्ती खर्चाची मर्यादा वाढविण्याबाबत … ग्रामविकास व पंचायत राज विभाग शासन निर्णय क्रमांक: वाहन-२०२६/प्र.क्र.९७/ई-१७५६७७४/पंरा-१ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मंत्रालय, मुंबई-४००००१. तारीख: ०६ नोव्हेंबर, २०२६.


संदर्भाधिन क्र.४ येथील दिनांक ११ ऑगस्ट, २०२६ रोजीच्या शासन निर्णयाच्या आधारे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांकडे मान्य असलेल्या वाहनांची देखभाल, तसेच वाहने देखाभाल व दुरुस्ती करण्यासाठी खालीलप्रमाणे खर्चाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे :-
अ) पेट्रोलवर चालणान्या प्रत्येक वाहनासाठी प्रतिवर्षी रु.१.०० लक्षपर्यत,
आ) डिझेलवर चालणान्या प्रत्येक वाहनासाठी प्रतिवर्षी रु.१.२० लक्षपर्यत,
इ) प्रत्येक इलेक्ट्रिक वाहनासाठी प्रतिवर्षी १.२० लक्षपर्यत,
२. सदर वाढीव मर्यादा या शासन निर्णयाच्या दिनांकापासून वाचा येथील क्र.१ च्या दिनांक ०९ जुलै, १९९९ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या वाहनांसाठी लागू राहील. तसेच ही सुधारित खर्चाची मर्यादा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनासही लागू राहील.
३. जिल्हा परिषदेकडे विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी वर्ग असलेली वाहने अथवा योजनांच्या अंमलबजावणीसाठी वापरली जाणारी वाहने यांना दुरुस्ती खर्चासाठी त्या त्या संबंधीत विभागाने विहित केलेली मर्यादा लागू असेल.
४. संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांकडील तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनांवरील देखभाल व दुरुस्तीचा खर्च संबंधीत जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या स्वनिधीतून करण्यात यावा. यासाठी कोणतेही शासकीय
अनुदान अनुज्ञेय असणार नाही. तसेच हा खर्च विहित मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही, याची सर्व संबंधीतांनी दक्षता व्यावी.
५. संदर्भाधिन क्र.४ येथील वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ११ ऑगस्ट, २०२६ अन्वये वित्तीय अधिकार नियमपुस्तिका-१९७८, भाग-पहिला मध्ये सुधारणा केल्या असून उपविभाग दोन, अ.क्र.२५, नियम क्र.६९ अन्वये शासकीय वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीच्या खर्चास मंजुरी देण्याचे जे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, त्याच अधिकारान्चये जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या वाहनांबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांना उक्त विवरणपत्राच्या रकाना क्र.६ मध्ये नमूद केल्यानुसार अटींच्या अधीन राहून प्रदान करण्यात येत आहे.

सविस्तर व अधिकृत माहिती साठी तारीख: ०६ नोव्हेंबर, २०२६. वर click करून माहिती मिळवून घ्यावे.

जिल्हा परिषद वाहन परिरक्षण व दुरुस्ती ४-०६-१९९०

akrushik atikraman bamboo cultivation bhusampadan central government Departmental Enquiries Departmental Exam devsthan inam Distribution of government land dress code extension Gavthan Gayran Government Decision government of india scheme government of maharashtra government of maharashtra scheme Government Resolution Government Resolution Maharashtra GR gunthevari Gurcharan gurucharan hector House allownce HRA inam jamin interest on pay khajagi jamin khajgi jamin land Maharashtra Government Maharashtra Government GR maharashtra grampanchayat adhiniyam MAHARASHTRA NAGARI SEVA MAHARASHTRA NAGARI SEVA SHIST V APIL pay commision satva vetan ayog seven pay commission SHETI sixth pay commission TA Tranfer Transfer of disabled employees vbgramg

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment