सोनोग्राफी मशिन्सचे निर्लेखन करण्यातबाबत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, ज्या सोनोग्राफी मशिन्स निरुपयोगी झाल्या आहेत अथवा त्या पुन्हा वापरात आणता येणार नाहीत अशा मशिन्स नष्ट करण्याचा अधिकार जिल्हास्तरीय समितीचा राहील. तसेच मशिनचा पुनर्वापर होणार असेल आणि दुरुस्ती करावयाची असेल अशी मशिन वापरण्यास धारकास मुभा राहिल. ज्या मशिनचे निर्लेखन करावयाचे आहे ती मशिन जिल्हा समितीकडे घेऊन येण्यासाठी जिल्हा समुचित प्राधिकारी यांनी मशिन धारकास मशिन स्थलांतर करण्यास परवानगी देण्याबाबतचे पत्र देईल.
सविस्तर अधिकृत माहितीसाठी तारीख: २४ सप्टेंबर, २०१८ pdf download करून घ्यावी.
क) ज्या सोनोग्राफी केंद्राना मशीन निर्लेखन करावयाचे आहे, त्या सोनोग्राफी केंद्रांनी मशिनचा मेक, मॉडेल, प्रोब इ. माहितीसह अर्ज जिल्हा समुचित प्राधिकारी यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. ज्या मशीन धारकांना मशीनचा प्रोब निर्लेखन करावयाचा नाही. अशा मशीनधारकांनी
त्या बाबतची माहिती अर्जामध्ये स्पष्ट नमूद करणे बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर करणे केंद्रांवर बंधकारक राहील. समितीतील समुचित प्राधिकान्यांनी अर्जातील नमूद माहिती आणि पीसीपीएनडीटी नियम १९९६ च्या नियम ४ (१) व ८ (१) तसेच ६ (२) (५) व ८ (२) नुसार
“ए”व “बी” फॉर्ममधील माहिती तपासून पाहील्यानंतर सदर समिती सोनोग्राफी मशीन निर्लेखन करण्याचा निर्णय घेईल. व निर्लेखन करावयाचा मशीनचा खर्च संबंधित केंद्रधारक किंवा मशीनधारक यांनी करावयाचा आहे. मशीन निर्लेखन करताना प्रदुषणाचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत
संबंधितांनी दक्षता घ्यावी. तसेच निर्लेखन करताना निर्माण होणान्या ई कचन्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रदुषण मंडळातील अधिकान्यांचे मार्गदर्शन घेण्यात यावे आणि मशीन निर्लेखनाच्या संपुर्ण प्रक्रियेचे व्हिडियो शुटींग करावे.
ड) सोनोग्राफी मशीन निर्लेखन करताना खालील बाबी तपासून पहाव्यात.
Application of owner
Affidavit of owner
Letter of transport of machine
M.R.C. Number
See same machine endorsed in “B” form
“B” form to be submitted condition of probe
Make/Model of machine
प्रस्तुत प्रक्रीयेत कालानुरुप होणाऱ्या बदलाप्रमाणे सुधारणा करता येतील.

akrushik atikraman bamboo cultivation bhusampadan central government Departmental Enquiries Departmental Exam devsthan inam Distribution of government land dress code extension Gavthan Gayran Government Decision government of india scheme government of maharashtra government of maharashtra scheme Government Resolution Government Resolution Maharashtra GR gunthevari Gurcharan gurucharan hector House allownce HRA inam jamin interest on pay khajagi jamin khajgi jamin land Maharashtra Government Maharashtra Government GR maharashtra grampanchayat adhiniyam MAHARASHTRA NAGARI SEVA MAHARASHTRA NAGARI SEVA SHIST V APIL pay commision satva vetan ayog seven pay commission SHETI sixth pay commission TA Tranfer Transfer of disabled employees vbgramg