Tuesday, July 8, 2025
Tuesday, July 8, 2025
Home » विभागीय चौकशी

विभागीय चौकशी

0 comment

सादरकर्ता अधिका-यांची कर्तव्य जबाबदा-या सर्व साधारण सूचना सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण २०२४/प्र.क्र.५७/विचो २. दि.०६.११.२०२४शासननिर्णय दि २५-०४-२०२५

सादरकर्ता अधिकाऱ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या सर्वसाधारण सुचना

-१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक वशिअ १२१४/प्र.क्र.२२/११, दि.२२.०८.२०१४
२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २०२४/प्र.क्र.५७/विचो २. दि.०६.११.२०२४
परिपत्रक
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ८ (५) (ब) आणि नियम
८ (५) (क) मधील तरतुदीनुसार ज्या विभागीय चौकशीच्या प्रकरणात, दोषारोप सिध्द करण्यासाठी चौकशी अधिका-याची नियुक्ती करण्यात येते, त्या प्रकरणात शिस्तभंगविषयक प्राधिकरणाच्या वतीने चौकशी प्राधिकरणासमोर प्रकरण सादर करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याची वा विधी व्यवसायीची सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. सादरकर्ता अधिकारी हे सेवारत अधिकारी असून त्यांची नियुक्ती पदनामाने करण्यात येते. सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याबर संबंधित अधिकाऱ्याने करावयाच्या कामांच्या अनुषंगाने तपशीलवार मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र.१ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२२.०८.२०१४ च्या परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत, तसेच विभागीय चौकशीची प्रकरणे चौकशी अधिका-यांकडे पाठविण्याबाबत, चौकशी अधिकारी यांच्या नियुक्ती आदेशाचा नमुना तसेच सोबत

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्याअनुषंगाने सक्षमप्राधिकारी घोषित करणे, सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक ०७-०४-२०२५

शासन परिपत्रक :-

शासकीय कर्तव्ये पार पाडीत असताना शासकीय कर्मचाऱ्याकडून घडलेल्या अपराध, गैरवर्तणूक किंवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा म.ना.से. (शिस्त व अपिल) नियम १९७९ अनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे योजिले जाते, तेव्हा अशी शिस्तभंगविषयक कार्यवाही करताना ती सक्षम प्राधिकाऱ्याने निदेशित करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेशिवाय आदेशीत केलेली विभागीय चौकशी तसेच देण्यात आलेली शिक्षा विधी अग्राहय ठरते व त्यामुळे अपराधसिध्दी होवूनही संबंधित अपचाऱ्यास दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी होत नाही.

२. शिस्तभंग विषयक कारवाईच्या अनुषंगाने संविधानाच्या अनुच्छेद ३११ च्या खंड (१) अनुसार बडतर्फी व सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा देण्याचे अधिकार संबंधिताच्या नियुक्ती प्राधिका-यापेक्षा दुय्यम प्राधिका-यास नाहीत. अन्य शिक्षांच्या बाबतीत नियुक्ती अधिकाऱ्यास दुय्यम असलेल्या अधिकाऱ्याकडे अधिकार सोपविता येतात.

३. सामान्य प्रशासन विभागाकडून उक्त संदर्भाधिन शासन निर्णय / परिपत्रके, नियम, इ. नुसार सेवाविषयक प्रकरणांबाबत मा. मुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागास सादर करावयाची प्रकरणे, नियुक्ती प्राधिकारी, किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम अधिकारी, लोकसेवा आयोगाशी पत्रव्यवहार करताना अवलंबावयाची कार्यपध्दती याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शिस्तभंग विषयक कारवाईचे प्रकरण हाताळताना या सर्व सूचनांचा विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा, शिस्तभंग विषयक कारवाई करावयाच्या प्रकरणांमध्ये त्रुटी राहून केलेली कार्यवाही निष्फळ ठरु शकते. यास्तव, सक्षम शिस्तभंगविषयक प्राधिकारी घोषित करणे आवश्यक आहे.

४. सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचे नियंत्रणाखालील अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार शिस्तभंगविषयक प्राधिकारी कोण राहतील याबाबतचे आदेश तात्काळ निर्गमित करावेत व ते शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावेत. शिस्तभंग विषयक प्रकरण सादर करतेवेळी सदर आदेशान्वये घोषित केलेले शिस्तभंग विषयक प्राधिकारी नमूद करुनच प्रकरण सादर करणे अनिवार्य करण्यात येत आहे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

विभागीय चौकशी आज्ञावली DE MODULE वापरण्याबाबतच्या सूचना शासन निर्णय दिनांक २४-०३-२०२५

चौकशी अधिकाऱ्याची कर्तव्ये व जबाबदाऱ्या दि १२-०३-२०२५

सन २०१८ मधील शासन निर्णय

विभागीय चौकशी प्रकरणाचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना सनियंत्रण अधिकारी नियुक्ती आणि त्याची कर्तव्ये व जबाबदारी साप्रवि क्र संकीर्ण १०१८ /प्र क्र/६१/ ११ अ दि २०/०६/२०१८

शासन परिपत्रक

(१) सर्व शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील सध्या प्रलंबित असलेल्या तसेच भविष्यात सुरू होणाऱ्या विभागीय चौकशांच्या कामकाजासाठी संनियंत्रण अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती केली नसल्यास तातडीने एका वरिष्ठ अधिकाऱ्याची संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करावी आणि त्या संनियंत्रण अधिकाऱ्याचे नाव व पदनाम प्रशासकीय विभागास कळवावे. चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकाऱ्याच्या नियुक्ती आदेशांत न चुकता सनियंत्रण अधिकायाचे नाव व पदनाम नमूद करावे आणि त्या आदेशांच्या प्रती संनियंत्रण अधिकाऱ्यास अग्रेषित कराव्यात.

(२) मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी शासनस्तरावरुन हाताळल्या जाणाऱ्या प्रकरणांसाठी संबंधित आस्थापनानिहाय संनियंत्रण अधिकारी नेमावेत. हे संनियंत्रण अधिकारी त्यांच्याकडे संनियंत्रणासाठी सोपविलेल्या प्रकरणांच्या संनियंत्रणाशिवाय त्याच्याशी संबंधित क्षेत्रिय कार्यालयातील संनियंत्रण अधिकाऱ्याऱ्यांकडून चौकशी प्रकरणांच्या प्रगतीचे त्रैमासिक अहपालही मागवितील, मंत्रालय स्तरावरील संनियंत्रण अधिकाऱ्यांची नाये व पदनामे प्रशासकीय विभागांनी सामान्य प्रशासन विभागाला कळवीत.

(१) संनियंत्रण अधिकाऱ्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ व्या नियम ८ मधील तरतुदींचे काळजीपूर्वका अवलोकन करून विभागीय बौकशीच्या कार्यवाहीमधील वेगवेगळ्या टप्प्यांची माहिती करुन घ्यावी.

(२) चौकशी अधिकाऱ्यास त्याचे नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर विहित कालावधीत पहिल्या सुनावणीची कार्यवाही होईल यासाठी संनियंत्रण अधिकाऱ्याने पाठपुरावा करावा, त्यानंतर चौकशीच्या कार्यवाहीतील पुढील सर्व टप्पे विहित वेळेत सुरू होऊन पूर्ण केले जातील यावर त्याने लक्ष ठेवावे. यात अडचणी उद्भवल्यास त्याने शिस्तभंगविषयक प्राधिकारी /सादरकर्ता अधिकारी / चौकशी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अडचणीचे निराकरण करुन घ्यावे व प्रकरणास गती द्यावी.

(3) चौकशी प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांवर चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांनी काही बाबीची पूर्तता करण्यासाठी या स्पष्टीकरणासाठी शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याशी केलेला सर्व पत्रव्यवहार संनियंत्रण अधिकाऱ्यासही अग्रेषित करावा. तसेच शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी प सादरकर्ता अधिकाऱ्यांशी केलेला पत्रव्यवहार संनियंत्रण अधिकाऱ्यासही अग्रेषित करावा. तथापि, चौकशीतील पुराव्याची कागदपत्रे व चौकशीचा अहवाल सनियंत्रण अधिकाऱ्यास पाठविण्याची आवश्यकता नाही. संनियंत्रण अधिकाऱ्याने या पत्रव्यवहाराची दखल घेऊन त्यात नमूद केलेल्या बाबींची संबंधितांकडून पूर्तता केली जाईल यासाठी पाठपुरावा कराया.

(४) संनियंत्रण अधिकारी शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यास चौकशी प्रकरणाच्या प्रगतीचा मासिक अहवाल सादर करील, संनियंत्रण अधिकाऱ्याऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यांत कसूर केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे त्यांच्या नियुक्ती आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात यावे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शिस्त भंगविषयक कारवाई
शासकीय कर्मचायांच्या मृत्यू नंतर तात्काळ संपुष्टत आणण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग दिनांक ३१-०५-२०१८

सन २०१७ मधील शासन निर्णय

विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अवलंबवयाच्या कार्यपद्धती बाबत, सामान्य प्रशासन विभाग दिनांक १५-१२-२०१७

सन २०१६ मधील शासन निर्णय

विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असतांना, निलंबन रद्द झाल्याने पुनस्थापीत झालेल्या कर्मचाऱ्याच्या/अधिकाऱ्याच्या,वेतनवाढ अनु यबाबत  वित्तविभाग शा परिपत्रक क्र आप्रयो-१०१६/प्र क्र६७/२०१६/ सेवा-३ दि ०८/०९/२०१६

सन २०१४ मधील शासन निर्णय

सादरकर्ता अधिकाऱ्याची कर्तव्य व जबाबदाऱ्या सर्वसाधारण सूचना,    साप्रवि परिपत्रक क्र वशिअ- १२१४/प्रक्र २२/११ दि २२/०८/२०१४

विभागीय चौकशीतील दोषरोपांचे ज्ञापन जोडपत्रे तयार करताना तसेच ती शासकीय कर्मचरि क चौकशी अधिकाऱ्यानां  पाठविताना घ्यावयाची काळजी, साप्रवि परिपत्रक क्र वशिअ- १३१४/प्रक्र २३/११ दि १९/०८/२०१४

विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असतांना, निलंबन रद्द झाल्याने पुनस्थापीत झालेल्या कर्मचाऱ्याच्या/अधिकाऱ्याच्या,वेतननिश्चिती बाबत,  वित्तविभाग शा नि क्र वेतन-१३/प्र क्र४४/सेवा-३ दि २३/०५/२०१४

प्रस्तावना –

ज्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील ८ अथवा १० खाली विभागीय चौकशी सुरू आहे अथवा ज्या अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द न्यायालयात, भारतीय दंड विधान वा लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अंतर्गत वा अन्य कायद्यातील तरतुदी अंतर्गत दावा न्यायप्रविष्ठ आहे. अशा शासकीय कर्मचा-यास, त्याच्याविरुध्दचे सदर प्रकरण अंतिमतः निकाली निघण्यापूर्वीच, सदर प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहुन त्यास विहित कार्यपध्दती अनुसरून शासन सेवेत पुनर्स्थापना (Reinstate) करण्यात येते. त्यावेळी त्याचे पुनर्स्थापनेच्या पदावरचे वेतन हे, त्याच्या निलंबनाच्या अगोदरच्या तारखेस तो जेवढे वेतन घेत होता तेवढेच वेतन निश्चिती होईल किंवा कसे? हया बाबतची तरतुद, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मध्ये केलेली नाही. तसेच सदर बाबत स्पष्ट तरतुद करणारा शासन निर्णय देखील हयापूर्वी निर्गमित झालेला नाही. सदर शासन निर्णय निर्गमित करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. त्याबाबत शासनाने आता खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

ज्या कर्मचा-याविरूध्द शिस्तभंगाची किंवा न्यायालयीन कारवाई अंतिमरित्या पुर्ण होण्यापूर्वीच, निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येऊन वा रद्द करण्यात येऊन त्यास शासन सेवेत पुनर्स्थापित करण्यात आल्यास, अशा शासकीय कर्मचा-याचे वेतन हे त्याच्या निलंबनाच्या लगतच्या दिवशी तो जेवढे वेतन घेत होता, तेवढ्याच वेतनावर निश्चिती करण्यात येईल, मात्र अशा प्रकारे निश्चित केलेले संबंधित कर्मचा-याचे वेतन हे त्याचा निलंबन कालावधी, भविष्यात ज्या प्रकारे नियमित होणार आहे, त्याबाबतच्या निर्णयाच्या अधीन असेल.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

सन २०११ मधील शासन निर्णय

विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यासाठी पोलीसांच्या ताब्यात असेलल्या कागदपत्राच्या प्रती विभागीय अधिकाऱ्याना उपलबद्ध करून देण्या बाबत,साप्रवि शा परीपत्रक क्र सीडीआर१०११/प्र क्र १४९ /११  दि ३१/१२/२०११

परिपत्रक

शासकीय कर्मचाऱ्यावर अभियोग दाखल करण्यास मंजुरी देतानाच त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. तथापि, अभियोगाच्या कार्यवाहीसाठी सदर शासकीय कर्मचाऱ्यावरील दोषारोपांशी संबंधित मूळ कागदपत्रे पोलीसांनी ताब्यात घेतली असल्यास कागदपत्रांअभावी संबधित कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करणे शक्य होत नाही, ही बाब लक्षात घेऊन पंचायत राज समितीने त्यांच्या सन २००५-२००६ च्या तिसऱ्या अहवालात अशी शिफारस केली आहे की, पोलीसांच्या ताब्यात असलेल्या मूळ कागदपत्रांच्या प्रमाणित छायाप्रती विभागीय अधिकाऱ्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत आवश्यक त्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात.

२. कर्मचाऱ्यावर न्यायालयात अभियोग दाखल करतानाच त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यासाठी त्या प्रकरणातील आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या फोटो स्टेंट प्रती काढून घ्याव्यात अशा आशयाच्या सूचना विभागीय चौकशी नियमपुस्तिका, १९९९ मधील परिच्छेद-४.२ अन्वये देण्यात आल्या आहेत. तथापि, पोलीसांनी एखाद्या प्रकरणी अचानक कार्यवाही केल्यास ज्या आधारे कर्मचाऱ्यावर दोषारोप ठेवावयाचे आहेत त्या कागदपत्रांच्या प्रती काढून घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे, पंचायत राज समितीच्या वरील शिफारशीच्या अनुषंगाने आता असे कळविण्यात येते की, न्यायालयात अभियोगासाठी पोलीस यंत्रणेने मूळ कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली असतील अशा प्रकरणी संबंधितांवर त्याचवेळी विभागीय चौकशीची कार्यवाही करणे शक्य व्हावे म्हणून त्या कागदपत्रांच्या प्रमाणित छायाप्रती तयार करण्यास पोलीस यंत्रणेने विभागीय अधिकाऱ्यांना अनुमती द्यावी. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

निलंबित शासकीय सेवकाच्या प्रकरणांचा आढावा साप्रवि शा नि क्र निप्रआ- ११११/प्रक्र ८६/११-अ दि १४/१०/२०११

३. ज्या प्रकरणी शासकीय अधिकारी कर्मचा-यावर बेहिशोबी मालमत्ता, नैतिक अधःपतन, लाच लुचपत, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार या व या सारख्या गंभीर प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल झाल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली असेल अशा प्रकरणी निलंबनाच्या दिनांकापासून एका वर्षानंतर प्रकरण संबंधित निलंबन आढावा समितीसमोर विचारार्थ सादर करण्यात यावे.
अ) असे प्रकरण निलंबन आढावा समिती समोर सादर करण्यापूर्वी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या विरूध्द विभागीय चौकशी चालू करण्यासंदर्भात (चालू करावी किंवा आवश्यकता नाही)
विभागीय चौकशी नियुमपुस्तिका मधील परिच्छेद ४.२ मधील तरतूदीनुसार शिस्तभंग विषयक प्राधिकारी यांच्या स्तरावर जाणीव पूर्वक निर्णय घेण्यात यावा.
ब) वरील प्रमाणे जेथे विभागीय चौकशी चालू करण्याबद्दल निर्णय घेतला असेल तेथे संबंधितांवर दोषारोप पत्रे बजावण्यात यावीत व त्याबाबतची सद्यःस्थिती नमूद करून प्रकरण निलंबन आढावा समिती समोर सादर करण्यात यावे.
क) ज्या प्रकरणात विभागीय चौकशी करावयाची आवश्यकता नाही असे सक्षम प्राधिकाऱ्याचे मत झाले असेल तेथे त्याबाबतची सविस्तर कारणमीमांसा नमूद करून असे प्रकरण निलंबन आढावा समिती समोर सादर करण्यात यावे.
ड) (i) एकाच प्रकरणात एकाच विभागातील एकापेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी गुंतलेले असून ते निलंबित असतील तर अशा प्रकरणात त्या सर्व अपचाऱ्यांपैकी वरिष्ठतम अधिकाऱ्याच्या निलंबनाचा आढावा घेण्यास सक्षम असलेल्या समिती समोर त्या प्रकरणातील सर्वच अधिकारी / कर्मचारी यांचा प्रस्ताव एकत्रितपणे मांडण्यात यावा जेणेकरून, एकाच प्रकरणातील अधिकारी / कर्मचारी यांच्या पुनःस्थापनेबाबत समान निर्णय घेणे निलंबन आढावा समितीस शक्य होईल.
(ii) एकाच प्रकरणात एकापेक्षा अधिक विभागातील अधिकारी व कर्मचारी गुंतलेले असून ते निलंबित असतील तर अशा प्रकरणात त्या सर्व अपचाऱ्यांपैकी वरिष्ठतम अधिकाऱ्याच्या निलंबनाचा आढावा घेण्यास सक्षम असलेल्या समिती समोरच त्या प्रकरणातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांचा प्रस्ताव एकत्रितपणे वरिष्ठतम अधिकाऱ्यांच्या विभागामार्फत निलंबन आढावा समिती समोर सादर करण्यात यावा. जेणेकरून एकाच प्रकरणातील अधिकारी / कर्मचारी यांच्या पुनःस्थापनेबाबत समान निर्णय घेणे निलंबन आढावा समितीस शक्य होईल.

३) एकदा निलंबन आढावा समितीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रकरणात काही बदल प्रगती झाली असेल तरच ते प्रकरण पुन्हा निलंबन आढावा समितीच्या लगतच्या पुढील बैठकीत विचारार्थ ठेवता येईल अन्यथा असे प्रकरण ६ महिन्यांनंतर सक्षम प्राधिकाऱ्यास निलंबन आढावा समितीसमोर सादर करता येईल.
४. निलंबन आढावा समितीने, प्रकरणांचा आढावा घेताना पुढील बाबी विचारात घ्याव्यात.
अ) फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणात न्यायालयात दोषारोप पत्र / अभियोग दाखल झाल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीत प्रकरणाचा निकाल लागला नसेल तर अशा प्रकरणी निलंबन संपुष्टात आणून अकार्यकारी पदावर नियुक्ती देण्याची शिफारस संबंधित निलंबन आढावा समिती करू शकते.
4) ज्या ठिकाणी न्यायालयात दोषारोप पत्र / अभियोग दाखल होऊन २ वर्षांचा कालावधी झालेला नसेल किंवा दोषारोप पत्र अभियोग दाखल झालेला नसेल अशा प्रकरणी निलंबन आढावा समितीने खालील बाबी विचारात घेऊन उचित शिफारस करावी.
(i) विभागीय चौकशांतील/न्यायालयात दाखल झालेल्या दोषारोपपत्रातील दोषारोपाचे गांभीर्य, स्वरूप व व्याप्ती तसेच, तो सिद्ध झाल्यास होऊ शकणारी कमाल शिक्षा.
(ii) निलंबनाचा कालावधी.
(iii) फौजदारी गुन्हयाच्या संदर्भात सक्षम न्यायालयात अभियोग दाखल करण्याच्या प्रक्रियेची सद्यःस्थिती.
(iv) संबंधिता विरुध्द चालू असलेली विभागीय चौकशी न्यायालयीन कार्यवाही दोषारोप पत्र सादर करण्याच्या कार्यवाहीत विलंबास संबंधित अपचारी जबाबदार आहे किंवा कसे?
(v) संबंधित अधिकारी / कर्मचा-यांचा त्यापूर्वीचा सेवा तपशील व सक्षम प्राधिका-याचे मत.
(vi) संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांस अदा करण्यात येणाऱ्या निर्वाह भत्त्याची टक्केवारी व रक्कम
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

विभागिय चौकशी अधिकारी-२ यांच्याकडे विभागीय चौकशीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत मार्गदर्शन सूचना, साप्रवि शा परीपत्रक क्र विभाचौ ११११/(९/११)/ साअ-२ दि ०१/०७/२०११

२) विभागीय नियम पुस्तिका, १९९१ (नियम क्र. ६.६) मधील खालील तरतुद पहावी. प्राथमिक चौकशीच्या वेळी अनेक साक्षीदारांची तपासणी करुन त्यांच्या जबाबाची नोंद घेण्यात येते. अशा साक्षीदारांच्या यादीची काळजीपूर्वक तपासणी करण्यात येऊन जे साक्षीदार आरोप साधार असल्याबद्दल निश्चित पुरावा देऊ शकतील, अशाच साक्षीदारांना प्रत्यक्ष चौकशीच्या वेळी साक्ष देण्याच्या दृष्टीने यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे.
वरील तरतूद लक्षात घेता, जर एखाद्या प्रकरणात साक्षीदार नसतील किंवा प्राथमिक चौकशी केली नसेल तर दोषारोप कशाच्या आधारे ठेवण्यात आले आहेत हे स्पष्ट करावे.
३) प्रशासकीय विभागाने दोषारोपात नमूद केलेल्या प्रत्येक कागदपत्राची साक्षांकित प्रत अपचा-याला दोषारोप पत्र बजावताना उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तसेच सदर सर्व कागदपत्रे चौकशी अधिका-यांना उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. (जोडपत्र-४ मध्ये नमूद केलेल्या कागदपत्राव्यतिरीक्त) (विभागीय चौकशी नियम पुस्तिका, १९९१, नियम ६.७, ६.९ व ६.१४ पहावा)
४) जोडपत्र ४ मध्ये नमूद केलेले कागदपत्रांना योग्यरित्या चिन्हांकित करण्यात यावे. (जोडपत्र ४ मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांना पी-१, पी-२ या प्रमाणे क्रमांक देण्यात यावेत. (विभागीय नियमपुस्तिका ६.१६ (२) कृपया पहावा.)
५) सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक, दिनांक ५.१.१९९३ नुसार नेमलेल्या सनियंत्रण अधिका-याच्या नेमणुकीचे आदेश, समन्वय अधिका-याचा पत्ता व दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक याचा तपशिल देण्यात यावा.
६) चौकशी अधिकारी/सादरकर्ता अधिकारी यांच्या नेमणुकीचे आदेश जोडतानाच वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे जोडावीत.

७) अपचारी /साक्षीदार यांच्या पत्त्यांत बदल झाल्यास त्याबाबत चौकशी अधिकारी यांना अवगत करण्याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना देण्यात याव्यात.
८) वर्ग-१ च्या विभागीय चौकशी प्रकरणात शासन सक्षम प्राधिकरण असल्याने संबंधित प्रशासकीय मंत्रालयीन विभागानी प्रस्तावाबाबत वेळोवेळी लागणारी माहिती चौकशी अधिकारी यांना उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
९) दोषारोप पत्र व जोडपत्र-४ मधील साक्षांकित कागदपत्रांचे तीन संच देण्यात यावेत.
संगणक संकेतांक क्रमांक २०११०७०११६४२०९००१ असा आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

शासकीय कर्मचाऱ्याकडून शास्कीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत तरतुदीची अंमलबजावणी आढावा      साप्रवि शा परिपत्रक क्र शाकाप-१००९/प्रक्र१५ /०९ /१८ (रवका) दि २४/०५/२०११

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ हा दिनांक २५ मे, २००६ च्या अधिसूचनेन्वये दिनांक १ जुलै, २००६ पासून राज्यात लागू झाला आहे. सदरहू अधिनियमातील प्रकरण तीन मधील कलम ८ ते १२ अन्वये प्रत्येक शासकीय कर्मचारी त्याला नेमून दिलेली किंवा त्याच्याशी संबंधित असलेली शासकीय कर्तव्ये किंवा शासकीय काम अत्यंत दक्षतेने आणि शक्य तितक्या शिघ्रतेने पार पाडण्यासाठी कायदेशीररित्या बांधील आहे.
सदरहू अधिनियमाच्या कलम १० च्या पोटकलम (२) व (३) अन्वये शासकीय काम पार पाडण्यासाठी जाणूनबुजून किंवा हेतूपुरस्सर विलंब लावणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुध्द कारवाई करणे बंधनकारक आहे. सदरहू तरतूदींची अंमलबजावणी, अधिनियमाचा मुळ उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने कितपत होत आहे, याचा आढावा घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. यास्तव सर्व विभागाकडून व सर्व कार्यालयांकडून अशा कसूरी करणाऱ्या किती अधिकारी /कर्मचाऱ्यांविरुध्द कारवाई झाली आहे, याबाबतची तपशीलवार माहिती अत्यंत तातडीने व उशिरात उशिरा दिनांक २० मे, २०११ पर्यंत सामान्य प्रशासन विभाग (रचना व कार्यपध्दती) कडे पाठवावी.

शासकीय कर्मचाऱ्याकडून शास्कीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कसुरीबबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत, साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण १०१०/प्रक्र१२६/२०१०/१८ (रवका) दि ०६/०४/२०११

महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ हा दि. २५मे, २००६ च्या अधिसूचनेन्वये दि. १ जुलै, २००६ पासून राज्यात लागू झाला आहे. सदरहू अधिनियमातील प्रकरण तीन मधील कलम ८ ते १२ नुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी त्याला नेमून दिलेली किंवा त्याच्याशी संबंधित असलेली शासकीय कर्तव्ये किंवा शासकीय काम अत्यंत दक्षतेने आणि शक्य तितक्या शीघ्रतेने पार पाडण्यासाठी कायदेशीररित्या बांधील आहे. सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांना सदरहू अधिनियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन होत असल्याची दक्षता घेण्याबाबत संदर्भाकित दि. ११ जुलै, २००६ च्या परिपत्रकान्वये कळविण्यात आलेले आहे. असे असूनही अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करतात व उपरोक्त कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा परिस्थितीमुळे उपरोक्त अधिनियमाच्या प्रकरण तीन मधील कलम १० च्या पोट कलम (२) व (३) च्या खालील नमूद केलेल्या विशिष्ट तरतुदी सर्व मंत्रालयीन विभाग, विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांच्या नजरेस आणण्यात येत आहेत.

कलम-१० (२) एखाद्या शासकीय कर्मचा-यास नेमून दिलेले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले शासकीय कर्तव्य किंवा शासकीय काम पार पाडण्यास जाणूनबुजून किंवा हेतूपुरस्सर विलंब लावणे किंवा दुर्लक्ष करणे ही, अशा शासकीय कर्मचा-याच्या कर्तव्यपालनातील कसूर ठरेल आणि असा शासकीय कर्मचारी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अन्वये, किंवा अशा कर्मचा-याला लागू असलेल्या अन्य कोणत्याही संबध्द शिस्तविषयक नियमांखाली, यथोचित शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र होईल.
कलम-१० (३) कोणत्याही शासकीय कर्मचा-यांकडून झालेली कर्तव्यपालनातील अशी कोणतीही कसूर संबंधित सक्षम प्राधिका-याच्या लक्षात आल्यावर किंवा त्याच्या लक्षात आणून दिल्यावर, अशा शासकीय कर्मचा-याकडून झालेल्या, अशा कर्तव्यपालनातील कसुरीबाबत त्यांची खात्री पटल्यावर, तो कसूर करणा-या अशा शासकीय कर्मचा-याविरुध्द, अशा शासकीय कर्मचा-याच्या वार्षिक गोपनीय अहवालात अशा कर्तव्यपालनातील कसूरी संबंधातील नोंद करण्यासह संबध्द शिस्तविषयक नियमांखाली, यथोचित शिस्तभंगाची कारवाई करील.
उपरोक्त कायद्याचा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी त्यातील सदरहू तरतुदींची देखील प्रभावी अंमलबजावणी होणे या अधिनियमानुसार बंधनकारक असल्याने सर्व मंत्रालयीन विभाग, विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखांनी सदरहू तरतुदींच्या अंमलबजावणीची कार्यवाही करावी.

शिस्तभंग/ विभागीय चौकशी कार्वैव्ह्या प्रकरणी लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठविताना घ्यावयाची दक्षता    साप्रव परिपत्रक क्र सीडीआर१००३/६३७/ प्रक्र १४/०३/२०११

सन २०१० मधील शासन निर्णय

सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत विभागिय चौकशीची कार्यवाही त्वरेने सुरु करण्याबाबत साप्रवि शा परीपत्रक क्र  सीडीआर १०१०/प्रक्र५६/११  दि ३०/१०/२०१०

शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, अनेकदा शासकीय अधिकारी / कर्मचारी सेवानिवृत्त होण्याच्या दिवशी किंवा त्या अगोदर काही दिवस, त्यांच्याविरूद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाच्या / समुचित प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर केला जातो. हे अनुचित आहे. अधिकारी / कर्मचारी यांच्याविरूद्ध विभागीय चौकशी आवश्यक असेल तर त्या संबंधातील अपहार / गैरव्यवहार / अनियमितता उघडकीस आल्यावर तात्काळ विभागीय चौकशीचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे. मात्र, क्षेत्रिय कार्यालये किंवा मंत्रालयीन विभाग स्तरावर अशा प्रकरणांत त्वरित प्राथमिक चौकशी करून विभागीय चौकशीचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला जात नाही. यापैकी अनेक प्रकरणे बऱ्याच आधीची असतात. प्राथमिक चौकशी पूर्ण होऊनही बराच कालावधी झालेला असतो मात्र दोषारोप पत्र बजावण्यास विलंब लावला जातो. काही वेळा अपचाऱ्याचा खुलासाही प्राप्त झालेला असतो परंतु चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती त्वरित केली जात नाही. प्रदीर्घ विलंब लावला जातो व कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर केला जातो. अशा प्रकरणात निर्णय घेणाऱ्या प्राधिकरणावर एकतर घाईगडबडीत निर्णय घेण्याची जबाबदारी पडते तसेच, त्यावर तातडीने (म्हणजे कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीपूर्वी) निर्णय न झाल्यास कर्मचारी विनाचौकशी सुटू शकतो किंवा त्यातून न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता असते.
२. वरील बाबींच्या अनुषंगाने, शासन असे आदेश देत आहे की, प्राथमिक चौकशीअंती तथ्य आढळलेल्या प्रकरणांत नजिकच्या सहा महिन्याच्या काळात सेवानिवृत्त होणारा अधिकारी / कर्मचारी गुंतला असेल तर, अशा प्रकरणी एक विशेष बाब म्हणून प्राधान्याने संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्ती पूर्वी किमान ३ महिने अगोदर विभागीय चौकशी सुरू होईल व शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक सीडीआर-१०९७/१५६/प्र.क्र.१४/९७/अकरा, दि.२४ फेब्रुवारी, १९९७ नुसार एकूण चौकशीची कार्यवाही एका वर्षात पूर्ण होईल अशा रितीने कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी. प्रकरणाच्या कोणत्याही टप्यावर अकारण विलंब झाल्याचे निदर्शनास आल्यास, अशा विलंबाला जबाबदार असणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यावर शिस्तभंगविषयक कारवाईचाही विचार करण्यात यावा.

विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्ताऐवज पाठविण्याबाबत, साप्रवि शा परीपत्रक क्र  सीडीआर १०९/प्रक्र ५०/ ०९/११  दि १३/५/२०१०

विभागीय चौकशींची प्रकरणे त्वरेने निकालात काढण्यासाठी शिस्तभंगविषयक प्राधिकारी तसेच चौकशी अधिकारी यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबतच्या सूचना संदर्भाधीन अनुक्रमांक (१) व (३) च्या शासन परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. तथापि त्याचे अनुपालन योग्य रीतीने न झाल्यामुळे विभागीय चौकशांची प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहतात. काही विभागीय चौकशी प्रकरणांमध्ये चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतरही चौकशी संबंधातील दस्तऐवज व मूळ कागदपत्र चौकशी अधिकारी यांचेकडे पाठविण्यामध्ये विलंब केला जातो वा टाळाटाळ केली जाते असे निदर्शनास आल्याने, चौकशी अधिका-याकडे दस्तऐवज व संबंधित कागदपत्रे सादर करण्याची ज्या अधिका-यावर जबाबदारी आहे अशा अधिका-याकडून दस्तऐवज व कागदपत्रे सादर करण्यामध्ये विलंब वा टाळाटाळ करण्यात येत आहे असे निदर्शनास आले तर अशा अधिका-याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशा सूचना संदर्भाधीन अनुक्रमांक (४), (५) (६) व (७) येथील परिपत्रकान्वये दिलेल्या आहेत. तरीही विभागीय चौकशीची प्रकरणे चौकशी अधिकारी यांचेकडे चौकशीसाठी सुपूर्द करतांना संबंधित शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांचेकडून सर्व बाबींची पूर्तता होत नाही. परिणामी चौकशीची प्रक्रिया वेळीच सुरु होत नाही असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यास्तव शिस्तभंगविषयक प्राधिकारी यांनी चौकशी अधिकारी यांचेकडे चौकशीसाठी प्रकरण पाठवितांना संदर्भाधीन परिपत्रकातील सूचनांसह पुढील बाबींची पूर्तता करुनच पाठविण्याची दक्षता घ्यावी
१) चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांच्या नियुक्तीचे आदेश
२) दोषारोपांचे ज्ञापन (जोडपत्र १ ते ४)
३) सामाईक कारवाई असेल तर नियम १२ खालील आदेश
४) जोडपत्र-४ मधील कागदपत्रांचे सुस्पष्ट व साक्षांकित संच
५) जोडपत्र-३ मधील साक्षीदारांचे अद्ययावत पत्ते, शक्य असल्यास दूरध्वनी / भ्रमणध्वनी कमांक. अथवा सेवानिवृत्त असल्यास त्याचा घरचा अद्ययावत पत्ता, दूरध्वनी क्रमांक.
६) अपचा-याने दोषारोपपत्रास अनुसरुन केलेले निवेदन असल्यास त्याची प्रत सोबत पाठविण्यात यावी. नसल्यास तसे स्पष्ट करावे.

सन २००९ मधील शासन निर्णय

शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्याविरुध्द सुरु असलेल्या विभागीय चौकशी कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यामार्फत करण्याच्या पद्धतीत बदल करणेबाबत, साप्रवि शा नि क्र एसपीओ-२८०७/ प्रक्र २१/०७/११-अ दि २८/१०/२००९

ब) गट-क व गट-ड च्या विभागीय चौकशीसाठी सध्या अस्तित्वात असलेली कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यांच्या प्रचलित पध्दतीमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत.
गट-‘क’ व गट-‘ड’ च्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी सध्या अस्तित्वात असलेली कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडे विभागीय चौकशीची प्रकरणे सोपवून निकाली काढण्याची पध्दत खालील सुधारणा करुन आहे तशीच चालू ठेवण्यात यावी.
१. कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या चौकशी अधिकाऱ्याकडे केवळ गट क व गट ड च्याच संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशा देण्यात याव्यात.
२. कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या चौकशी अधिकाऱ्यांच्या प्रचलित मानधन पध्दतीत बदल करुन एक अपचारी असलेल्या विभागीय चौकशी प्रकरणी रु.५०००/- इतक्या मानधनाऐवजी रु.८०००/- इतके मानधन देण्यात यावे.
३. एकापेक्षा अधिक अपचारी असल्यास प्रत्येक अपचाऱ्यामागे रु.१०००/- इतके वाढीव मानधन मूळ मानधनाच्या रकमेत (रु.८०००/-) वाढवून देण्यात यावे. मात्र सदर वाढीव मानधनाची कमाल मर्यादा रु.१५०००/- इतकी राहिल.
४. चौकशी अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आलेली विभागीय चौकशीची प्रकरणे जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये निकाली काढण्याचे बंधन टाकण्यात यावे. अशी कालमर्यादा पाळणे शक्य नसेल अशा प्रकरणी संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी ही बाब विभागप्रमुखांच्या/शिस्तभंगविषय प्राधिकाऱ्याच्या निदर्शनास आणावी. सदर कालमर्यादा प्रकरणाची सद्यस्थिती विचारात घेऊन विभागप्रमुखांनी ३ महिन्यापर्यंत मुदत वाढविण्यास अनुमती द्यावी. त्यासाठी शासन निर्णय क्रमांकः प्रविचौ-२००८/प्र.क्र.११/०८/११-अ, दि.७.४.२००८ मधील तरतूदीप्रमाणे कार्यवाही करावी.

सन २००८ मधील शासन निर्णय

विभागीय चौकशीअंती देण्यात आलेल्या शिक्षे संदर्भाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारणाने दिलेल्या अंतिम आदेशानंतर संबधित अपिलीय प्राधिकारी यांनी त्या प्रकरणातील कोणतेही अपील, पुनरिक्षण वा पुनर्विलोकन अर्ज विचारात घेऊ नये यासंदर्भातील सूचना, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक सीडीआर-१००८/प्र.क्र.३१/०८/११, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : १४ ऑक्टोबर, २००८.

शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्याच्या ५ वर्षा पेक्षा जास्त कालावधीपर्यंत प्रलंबित विभागीय चौकशी बाबत   साप्रवि परिपत्रक क्र प्रविचौ-२००८/ प्र क्र ११/०८/११ अ दि ७/४/११-अ दि ०७/०४/२००८

सन २००७ मधील शासन निर्णय

विभागीय चौकशी प्रकरणात कर्मचाऱ्याच्या वतीने सेवेत असेलेल्या वा सेवेत असेलेल्या वा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास बचाव सहाय्यक म्हणून मदत करण्याची परवानगी देणे बाबत, ग्रा वि  ज व शा नि क्र डीईएन-२००७/ प्र कर १९०/आस्था-१२/ दि ०८/०३/२००७

सन २००६ मधील शासन निर्णय

राजकीय संघटनाचे कार्यकर्ते आणि अशासकीय व्यक्ती यांच्यामार्फत शासकीय कर्मचाऱ्यानि त्याच्या तक्रारीचे निवारण आणि वैयक्तिक कामे करून घेण्यास प्रतिबंध,साप्रवि शा नि क्र सीडीआर-१००६/१२/०६ अकरा दि १७/०८/२००६

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवेसंबंधीच्या कोणत्याही बाबीसंबंधात राजकीय पुढाऱ्यांकडून दबाव आणणे ही गैरवर्तणूक आहे. सबब शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवाविषयक बाबीसंबंधीच्या तक्रारीचे निवारण आणि वैयक्तिक कामे करुन घेण्यासाठी खासदार, आमदार, राजकीय संघटनांचे कार्यकर्ते आणि इतर अशासकीय व्यक्ती यांच्यामार्फत त्यांची गाऱ्हाणी माननीय मंत्र्यांकडे नेऊ नयेत आणि तसे केल्याचे आढळून आल्यास ते शिस्तभंग कारवाईस पात्र ठरतील,

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

राज्य शासनाच्या सेवेतील निलंबित अधिकारी /कर्मचारी यांच्या विभागीय चौकशी बाबत   साप्रवि शा नि क्र सीडीआर-१००६/प्रक्र २/०६११-अ  दि २५/०७/२००६ [ दि ०७/०४/२००८ ह्या शासन निर्णया नुसार हा शासन निर्णय रद्द केलेला आहे ]

राजपत्रीत अधिकाऱ्याविरूध्दची व अराजपत्रीत कर्मचाऱ्याविरुध्दची विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे सोपुवून निकाली काढणे बाबत,साप्रवि शानिक्र एसपीओ-२८०४/प्रक्र ११/२००४/११-अ दि २६/०५/२००६

तद्नुषंगाने सर्व शिस्तभंगविषयक प्राधीकाऱ्यांनी राजपत्रित अधिकाऱ्यांविरुध्दची व अराजपत्रित कर्मचाऱ्यांविरुध्दची विभागीय चौकशीची प्रादेशिक विशेष अधिकारी, विभागीय चौकशा आणि जिल्हा चौकशी अधिकारी, विभागीय चौकशा यांच्या कडील अथवा त्यांच्या कक्षेतील सर्व प्रकरणे दिनांक १ जुलै, २००६ पासून कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडे सोपवून निकाली काढावीत.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

सन २००५ मधील शासन निर्णय

शासकीय कर्मचाऱ्याकडून शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील कासुरीबाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत,साप्रवि शा नि क्र सकीर्ण-१००५/३४/प्रक्र ८/ २००५/ १८(रवका) दि ०७/०४/२००५

(१) प्रत्येक शासकीय कर्मचारी, त्यास नेमून दिलेली किंवा त्याच्याशी संबंधित असलेली शासकीय कर्तव्ये व कार्यालयीन काम अत्यंत दक्षतेने आणि शक्य तितक्या शीघ्रतेने पार पाडील.
(२) साधारणपणे कोणतीही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय कर्मचा-याच्या टेबलावर सात कामाच्या दिवसाचे वा अधिक काळ प्रलंबीत राहणार नाही.
(३) तात्काळ आणि तातडीच्या स्वरुपाच्या फाईली, त्या प्रकरणाच्या निकडीनुसार शक्य तितक्या शीघ्रतेने आणि प्राधान्याने, तात्काळ फाईल शक्यतो एका दिवसात किंवा दुस-या दिवशी सकाळी आणि तातडीच्या स्वरुपाची फाईल शक्यतो चार दिवसांत निकालात काढावी.
(४) दुस-या कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठवायूयाची आवश्यकता नसलेल्या फाईलींच्या संबंधात संबंधित विभाग त्या प्रकरणावर पंचेचाळीस दिवसांच आत निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी आणि दुस-या कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठवावयाची आवश्यकता असलेल्या फाईलीसंबंधात तीन महिन्यांच्या आत निर्णय घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी.
(५) शासकीय कर्मचा-यास नेमून दिलेली किंवा त्याच्याशी संबंधित असलेली शासकीय कर्तव्ये किंवा कार्यालयीन काम पार पाडण्यास त्याने जाणूनबुजून किंवा हेतुपुरस्पर विलंब लावला असेल किंवा त्यात हयगय केली असेल तर अशा शासकीय कर्मचा-यांच्या कर्तव्य पालनातील कसूरी ठरवावी आणि अशा शासकीय कर्मचा-यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अन्यये किंवा अशा कर्मचा-यांला लागू असलेल्या अन्य कोणत्याही संबंध शिस्त विषयक नियमांमध्ये यथोचित शिस्तभंग कारवाई करण्यात यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

सन २००१ मधील शासन निर्णय

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) सुधारणा नियम २००१,साप्रवि अधिसूचना सीडीआर-११९९/प्रक्र १६/ ९९/अकरा दि १८/०४/२००१

सन २००० पूर्वीचे शासन निर्णय

प्रलंबित विभागीय चौकशी तत्काळ निकालात काढण्यासाठी नेमलेल्या सेवानिवृत्त चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांना मानधन देण्याबाबत कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना,साप्रवि शानि क्र  सीडीआर १९९९/प्रक्र ३२/९९/११-अ   दि ०१/०३/२०००

मुद्दा क्र.१ :- मानधनाच्या रकमेचे वाटप कोणी व कोणत्या प्रकारे करावे :-
चौकशी अधिका-यांकडे सोपविलेले प्रकरण ज्या शिस्तभंगविषयक प्राधिका-याने सोपविले असेल त्या प्राधिका-यानेच मानधनाचा खर्च सोसावा व हे मानधन चौकशी अधिकारी तसेच सादरकर्ता अधिकारी यांना चुकते करावे. हा खर्च संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून भागविण्यात यावा. यासाठी संबंधित मंत्रालयीन विभागांनी आवश्यक झाल्यास सुधारीत अंदाज पाठविताना अतिरिक्त खर्चासाठी तरतूद प्रस्तावित करावी.
मुद्दा क्र.२ :- चौकशी अधिका-यांच्या कामासाठी अतिरिक्त कर्मचा-यांच्या नेमणुका करणे :-
चौकशी अधिका-यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रत्येक प्रकरणात एक लघुलेखक व एक लिपिक यांच्या नेमणुका करण्यास हरकत नाही. विभागीय आयुक्तांनी शासकीय कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अन्य खाजगी व्यक्ती यांना हया पदावर नेमावे. तसेच ते करीत असलेल्या कामाचा मोबदला म्हणून प्रत्येक प्रकरणी लघुलेखकास रु.१,०००/- व लिपिकास रु.७००/- याप्रमाणे मानधन मंजूर करण्यात यावे. या मानधनाबाबतचा खर्च तसेच मानधन चुकते करण्याची पध्दत चौकशी अधिका-यांना द्यावयाचे मानधन चुकते करण्याच्या पध्दतीप्रमाणेच राहील.
मुद्दा क्र.३:- चौकशी अधिका-यांना लेखनसामग्रीचा पुरवठा करणे :-
चौकशी आदेशित करणा-या शिस्तभंग प्राधिका-यांच्या कार्यालयाने चौकशी अधिका-यांची नेमणूक केल्यानंतर त्यांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे लेखनसामग्रीचा पुरवठा करावा. हा पुरवठा करताना त्यांनी वेळोवेळी विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क ठेवावा.
मुद्दा क्र. ४ :- चौकशी प्रकरणांचे वाटप :-
विभागीय आयुक्तांनी चौकशीच्या कामाचे वाटप करताना, कोणत्याही अधिकाऱ्यावर कामाचा अनाठायी बोजा पडू नये यादृष्टीने चौकशी प्रकरणांचे वाटप शक्यतो समप्रमाणात व अपचाऱ्यांची संख्या विचारात घेऊन करावे, यासाठी निश्चित संख्या ठरविता येणार नाही. परंतु कामाचे वाटप समप्रमाणात असावे असा दृष्टीकोन असावा.

म.ना. से(शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ व १० त्याचप्रमाणे म.ना. से (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम २७ नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करताना बजावण्यात येणाऱ्या दोषारोपबाबत       साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०००/प्रक्र२/११दि २५/०२/२०००

महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम २००० अपचारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर शिस्तभंग  कारवाई तत्काळ संपुष्टत साप्रवि शा नि क्र सीडीआर-११९९/९९/११दि २३/०२/२०००

राज्य शासनाच्या सेवेतील गट क व गट ड कर्मचाऱ्याच्या शिस्त भंगविषयक कार्यवाही बाबतचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला संदर्भित करण्याबाबत, साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९९/प्रक्र १०/९९/अकरा दि १४/०९/१९९९

महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम १९९८साप्रवि अधिसूचन क्र सीडीआर-१०९७/प्रक्र १०/९७ /अकरा दि ०६/०२/१९९८ 

महाराष्ट नागरी सेवा( शिस्त व अपील ) सुधारणा नियम १९९७ साप्रवि अधिसूचन क्र सीडीआर-१०९६/प्रक्र ५८-९६ /अकरा दि ०१/१२/१९९७

फौजदारी कार्यवाहीच्या तुलनेत विभागीय कारवाई,साप्रवि शा परिपत्रक क्र सीडीआर-१०९७/प्रक्र४६/९७/११-अ दि १८/११/१९९७

विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात केलेले दस्ताऐवज पाठीविण्याबाबत, साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रकरण-५६/९६ अकरा  दि १९/०४/१९९७ 

सेवा निवृत्त कर्मचाऱ्याच्या बाबतीत विभागीय चौकशीची प्रकरणे प्राथम्य क्रमाने पूर्ण करण्याबाबत साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९७/ प्रक्र१४/९७ अकरा  दि २४/०२/१९९७

परिपत्रक :
लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांनी शासनास सादर केलेल्या २२ व्या वार्षिक अहवालात असे अभिप्राय दिले आहेत की, शासकीय कर्मचा-यांविस्थ्दयी शिस्तभंग कार्यवाही ब-याच प्रकरणात कर्मचा-यांची सेवानिवृत्ती अगदी जवळ आल्यानंतर किंवा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ब-याच दिवसांनी केली जाते, अशा वेळी कर्मचा-यास केवळ तात्पुरत्या सेवानिवृत्तीवेतना खेरीज इतर आर्थिक लाभ होत नसल्याने त्याचे नुकसान होते. त्यामुळे अशा बाबतीत चौकश तातडीने पूर्ण होणे व त्यासाठी दोषारोप पत्र बजावणे, चौकशनि अधिकारी नेमणे या प्रक्रिया २ महिन्यात पूर्ण होणे आवश्यक आहे, व एकूण चौकशीची कार्यवाही १ वर्षात पूर्ण होणे आवश्यक आहे, असे लोकआयुक्त यांचे अभिप्राय आहेत.
वरील अभिप्राय व शिफारशी यांचा अभ्यास केल्यानंतर शासन अशा निष्कर्षाप्रत आले आहे की, तेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विस्थ्दची विभागीय चौकशी प्राथम्यक्रमाने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार शासन असे आदेश देत आहे की, विभागीय चौकशीची प्रकरणे शक्यतो कर्मचा-यांच्या सेवा-निवृत्तीच्या सुमारास किंवा सेवानिवृत्तीनंतर सुरु करण्याच्याप्रवृत्ती पातून परावृत्त व्हावे व अशा प्रकारच्या चौकशा मेश निवृत्तीपूर्वी पुरेसा अवधी शिल्लक असताना सुरु करण्याची दक्षता घ्यावी तथापि, जर काही विशिष्ट परिस्थितीत ही चौकशी सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा त्यानंतर सुरू करणे आवश्यक झाले तर अशा वेळी दोषारोप पत्र तातडीने बजावण्यात यावे.

तसेच चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी याप्यानेमणूका २ महिन्यात करण्यात याव्यात व विभागीय चौकशीची संपूर्ण कार्यवाही १ वर्षात पूर्ण होईल याची दक्षता घेण्यात यावी.
सर्व मंत्रालयीन विभागांनी वरील सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी. तसेच हया सूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांच्या निदर्शनास आणून त्यांना त्यांचे कटाक्षाने पालन करण्याप्त कळवावे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

चौकशी अधिकाऱ्याकडील अभिलेख सादरकर्ता अधिकाऱ्याच्या टाचनाचा समावेश करण्याबाबत     साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रक्र५६/९६ अकरा  दि १३/०९/१९९६

परिपत्रक: शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. सीडीआर-११६६/डी-१, दिनांक ९ डिसेंबर, १९६६ [प्रत संलग्न] मधील सूचनांप्रमाणे वौकशी अधिका-याकडील विभागीय चौकशी प्रकरणातील कागदपत्र एकाच फाईलमध्ये ठेवलेले असले तरी त्या कागदपत्रांची खाली दर्शविलेल्या शीर्षकांच्या लहान फाईल्समध्ये विभागणी करावयाची असते.

१. कार्यवाहीची फाईल.

२. दोषारोपाचे ज्ञापन, अभिकथने पुराव्याची विवरणपत्रे, यांची अभिस्वीकृत प्रत्त.

३. अपचा-याची तोंडी व लेखी निवेदने.

४ सरकारी साक्षीदारांची, निवेदने.

५. बवावाच्या साक्षीदारांची निवेदने.

६. शासकीय दस्तऐवज

७. बचावाचे दस्तऐवज

८. सारांश, कारणे दाखवा नोटीस, कारणे दाखवा नोटीशीत उत्त्तर, अंतिम आदेश आणि अपील व पुनरीक्षणातील आदेश.

९. संकीर्ण कागदपत्रे.

वरील यादीमध्ये सादरकर्ता अधिका-याच्या टाचणाचा समावेश करण्याचा प्रश्म शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने उपरोक्त दि.९ डिसेंबर, १९६६ च्या आदेशात अंशतः सुधारणा करून शासन असे आदेश देत आहे की, त्या आदेशानुसार वर दर्शविलेली यादी पुढीलप्रमाणे सुधारण्यात यावी.

क्र १ ते ८ बदल नाही

क्र.९ – सादरकर्ता अधिका-याचे टाचण.

क्र १० – संकीर्ण कागदपत्रे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ साप्रवि शा नि क्र सीडीआर-१०९६/ प्रक्र६९/९६ अकरा  दि ०२/०९/१९९६

विभागीय चौकशी त्वरित निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिकाऱ्याकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्ताएवज पाठविण्याबाबत,  साप्रवि शा नि क्र सीडीआर-११९६/ प्रक्र ५०/९६/११    दि ३१/०८/१९९६

विभागीय चौकशी प्रकरणा मध्ये चौकशी प्राधिकाऱ्याकडे चौकशीसाठी प्रकरण सोपविताना दस्ताऐवज व संबधीत कागदपत्रे सादर करण्या बाबत विलंब वा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करण्याबाबत      साप्रवि शा नि क्र सीडीआर-१८९६/प्रक्र६/९६/११अ   दि २०/०४/१९९६

विभागीय चौकशीअंती निलंबित कचा-यांचा निलंबन कालावधी नियमित करणे.

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्रमांक-सोडीआर-१०९५/२७८/प्रकरण-२०/२५/अकरा, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक २३ जानेवारी, १९९६

एकाच प्रकरणात गुंतलेल्या अनेक कर्मचा यासं विभागीय चौकशीची कार्यवाही. सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक : सीडीआर-१०८९/प्र.क. १३/१०/११ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ फेब्रुवारी १९९३

एकाच प्रकरणो न्यायिक कारवाई व विभागीय चौकशो एकाच वेळी सुरु असताना, विभागीय चौकशीतील दोषसिध्दीच्या आधारे घ्यावयाच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक डीईएन-३५९०/सीआर-१८७/२०, मंत्रालय, मुंबई, दिनांक :-8-MAY-1991

Departmental Enquiry Date ०५-०६-१९७४

निलंबन संबधी चे शासन निर्णया साठी येथे click करा

विभागीय चौकशी नियमपुस्तिका चौथी आवृत्ती, १९९१ PDF स्वरुपात download करण्यासाठी येथे click करा

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

36739

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.