महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 अन्वये आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमिनीच्या संदर्भात सर्वंकष सूचना. 19-05-2025 202505191242358519
महार वतन जमिनीचे पूर्व परवानगी शिवाय झालेली हस्तांतरण नियमाकुल न करणेबाबत शासनपत्र 07 ऑक्टोबर 2021
महार वतन जमिन भूसंपादन करताना आकारावयाची नजराणा रक्कम 11 जानेवारी 2017
जात इनामे नष्ट करण्यात आल्याने बिनशेती साठी नजराणा रक्कम न आकरणे बाबत शासनपत्र 09 मे 2014
वतन /इनाम जमिनीचा नजराणा भरण्यास मुदत वाढ महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक ०२-०८-२००८ साठी येथे Click करा
भूतपूर्व इनाम जमिनीच्या हस्तांतरणास परवानगी देताना नजराणा भरुन घेण्याची तरतूद आहे. जिल्हाधिकारी, नाशिक यांना एका विवक्षित प्रकरणांमध्ये उपरोक्त दिनांक ४/१२/१९९७रोजीच्या पत्रान्वये आदेशांच्या तारेखापासून ३ महिन्यांपर्यत नजराणा भरण्यास मुदतवाढ द्यावयाची असल्यास शासनाची मंजूरी घेण्यात यावी व अशी मुदतवाढ देताना आदेशांच्या दिनांकापासून नजराणा रक्कम भरेपर्यत १९१५ टक्के दरसाल दर शेकडा या दराने व्याज आकारणी करावी अशी ही सूचना या पत्रात करण्यात आलेली आहे.
२. भूतपूर्व इनाम जमीन हस्तांतरण करताना पूर्वपरवानगी घेतल्यास ५० टक्के नजराणा आकारणे अनिवार्य आहे. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त हे अशा हस्तांतरणास परवानगी देताना धारकाने नजराणा म्हणून किती रक्कम भरावी, याबाबत आदेश पारीत करतात. दिनांक ४/१२/१९९७रोजीच्या विभागाच्या पत्रानुसार आदेशाच्या तारखेपासून नजराणा भरण्यास तीन महिन्यापर्यत मुदत देण्यास जिल्हाधिका-यांना अधिकार दिलेले आहेत. तीन महिन्यानंतर धारकास नजराणा भरावयाचा असेल तर शासनाची पूर्वपरवानगी घेण्याची तरतूद नियमात अथवा शासन निर्णयात करण्यात आलेली नाही.
३. नजराणा भरण्या संदर्भात सक्षम प्राधिका-यांच्या आदेशानंतर किती मुदतीमध्ये धारकाने नजराणा धरणे आवश्यक आहे ? मुदतीत नजराणा न भरल्यास काय करावे ? ही बाबनजराणा निश्चित करण्याचे आदेश पारीत केल्याच्या तारखेपासून ते आदेश तीन महिन्यांपर्यत वैध राहतील. म्हणजे त्या आदेशाच्या दिनांकापासून ३ महिन्यांच्या आत संबंधित धारकाने नजराणा शासनाच्या कोषागारात जमा करणे आवश्यक राहील. अन्यथा सदर नजराण्याचे आदेश तीन महिन्यानंतर निष्प्रभावित होतील. सबब तीन महिन्यांच्या मुदतीनंतर धारकाला नजराणा भरावयाचा असेल, तर सक्षम प्राधिका-याने त्याबाबत नव्याने आदेश पारीत करावेत. असे आदेश पारीत करताना नजराणाची रक्कम नव्याने निश्चित करण्यात यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
नवीन अविभाज्य शर्थीने दिलेल्या इनाम वतन (महार वतन व देवस्थान इनाम जमीन वगळून) जमिनी ज्या भोगवटादार वर्ग २ च्या आहेत ,त्या सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीने /परवानगी शिवाय पूर्वीच शेत कारणाकरीत हस्तांतरित झाल्यास असे हस्तांतरण नियमाकुल करून भोगवटादार वर्ग १ करण्याबाबत महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक १७-०७-२००८ साठी येथे Click करा
प्रकरण पाच
मुंबई गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९५८ याची
सुधारणा.
६. मुंबई गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, १९५८ याच्या कलम ५ च्या पोट-कलम (३) याच्या प्रथम परिच्छेदाला त्याचा खंड (अ) असा नवीन क्रमांक देण्यात येईल आणि अशा प्रकारे नवीन क्रमांक देण्यात आलेल्या खंड (अ) नंतर, परंतु पहिल्या परंतुकापूर्वी, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल
“(ब) प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, भोगवटादाराने जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा कोणत्याही इतर प्राधिकाऱ्याच्या पूर्व मंजुरीशिवाय किंवा ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय अशा कोणत्याही भोगवट्याचे कृषिसंबंधी प्रयोजनासाठी आधीच हस्तांतरण केले असेल तर, अशा हस्तांतरणाचा पुरावा म्हणून त्याचे विक्री खत, बक्षीसपत्र, इत्यादींसारखे नोंदणीकृत संलेख सादर केल्यानंतर असे हस्तांतरण नियमित करता येईल. असे हस्तांतरण नियमित करण्यात आल्यानंतर. अशा जमिनीचा भोगवटा, संहितेच्या तरतुदीनुसार अशा हस्तांतरिती भोगवटादाराकडून नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार वर्ग दोन) धारण करण्यात येईल”
प्रकरण सहा
महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रह करणे) अधिनियम, १९६२ याची सुधारणा.
७. महाराष्ट्र मुलकी पाटील (पद रद्द करणे) अधिनियम, १९६२ याच्या कलम ५ च्या ११ पोट-कलम (३) याच्या प्रथम परिच्छेदाला, त्याचा खंड (अ) असा नवीन क्रमांक देण्यात येईल आणि अशा प्रकारे नवीन क्रमांक देण्यात आलेल्या खंड (अ) नंतर, परंतु पहिल्या परंतुकापूर्वी, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल
” (ब) प्रारंभाच्या दिनांकापूर्वी, भोगवटादाराने जिल्हाधिकाऱ्याच्या किया कोणत्याही इतर प्राधिकाऱ्याच्या पूर्व मंजूरीशिवाय किंवा ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय अशा कोणत्याही भोगवट्याचे कृषिसंबंधी प्रयोजनासाठी आधीच हस्तांतरण केलं असेल तर. अशा हस्तांतरणाचा पुरावा म्हणून त्याचे विक्री खत, बक्षीसपत्र, इत्यादीसारखे नोंदणीकृत संलेख सादर केल्यानंतर असे हस्तांतरण नियमित करता येईल, असे हस्तांतरण नियमित करण्यात आल्यानंतर, अशा जमिनीचा भोगवटा संहितेच्या तरतुदीनुसार, अशा हस्तांतरिती भोगवटादाराकडून नवीन व अविभाज्य शर्तीवर (भोगवटादार वर्ग दोन) धारण करण्यात येईलअधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
देवस्थान इनाम जमीनी शिफारशी करण्यासाठी समितिची स्थापना करण्याबाबत महसूल व वन विभाग दि12-06-2001
इनाम व वतन जमिनी रीग्रंट करणेबाबत 10 मार्च 2000
इनाम व वतन जमिनी रीग्रंट करणेबाबत 4 फेब्रुवारी 1983
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कर्मचारी व्यक्तिगत उपयोगी दालन
- कायदे व नियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास सेवा
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- पाणी पुरवठा विभाग
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
Leave a Reply