भूखंड खरेदी करून त्यावर घर बांधकाम करणेसाठी कर्ज ,स्वत: चे नांवाने भूखंड, प्लॉट असेत तर त्यावर बांधकाम करिता कर्ज ,नवीन /जुने तयार घर,Flat, खरेदी,विकत घेण्यासाठी, बांधकाम सुरु असलेले नवीन घर घेणेसाठी,घर बांधकाम करिता जमीन खरेदी करणे ,स्वत:चे मालकीचे राहत्या घराचे बांधकाम करून विस्तार करणे.राहत्या घराचे नैसगीक आपत्तीमुळे नुकसान झाले असल्यास वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याकरिता
२. (3) अप्रिम मंजुरीच्या गटी-
१. सुधारीत वेतन बैंड नुसार ज्या राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे ५ वर्षाच्या सेवेनंतरचे मूळ मासिक वेतन रु.५०,०००/- किंवा अधिक आहे अशा राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना या प्रयोजनार्थ अग्रिम अनुज्ञेय राहील.
२. नवीन मोटार कार खरेदीसाठी अग्रिमाची रक्कम अधिकाऱ्याच्या वेतन बैंड मधील मासिक वेतनाच्या १८ पट किंवा रु.१५,००,०००/- (रुपये पंचरा लक्ष फक्त) किया नवीन मोटार कारची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी अनुज्ञेय राहील.
शासन निर्णय क्रमांका त्रिम-२०२४/प्र.क्र.३२/२०२२/ विनियम
३. जुनी मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिमाची रक्कम अधिका-याच्या वेतन बैंड मधील मासिक वेतनाच्या ९ पट एवढी किंवा रु.७,५०,०००/- (रुपये सात लक्ष पन्नास हजार फक्त) किंवा जुन्या मोटार कारची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अग्रिम अनुज्ञेय राहील,
४. अग्रिमासाठी अर्ज करणाऱ्या अधिकाऱ्याची शासनाच्या सेवेतील नियुक्ती संबंधित पदाच्या सेवाभरती नियमानुसार करण्यात आलेली असली पाहिजे आणि अशाप्रकारे करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर कमीत कमी ५ वर्षाची सलग सेवा झाली असली पाहिजे.
५. मोटार वाहन चालविण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून, कुटुंबातील एका व्यक्तिला मिळालेल्या कायम अनुज्ञप्तीची (Permanent Licence) छायाप्रत सादर करणणे आवश्यक राहील.
६. अग्रिम मंजुरीपूर्वी अग्रिमासाठी अर्ज करणाऱ्या अधिकाऱ्याची सेवानिवृत्तीपूर्वी संपूर्ण अग्रिम रक्कम परतफेड करण्याची क्षमता असल्याची, अग्रिम मंजूर करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याची खात्री असावी,
७. अर्जदाराने आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर सक्षम प्राधिकारी, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, अनुसार प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकाराप्रमाणे मोटार कार अग्रिम मंजूर करू शकतील.
८. मोटार कार अग्रिम मंजुरीच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत अग्रिम धारकाने मोटार कार खरेदी करावी. तसेच खरेदी केलेल्या मोटार कारच्या उत्पादनाचे वर्ष, खरेदीची तारीख व नोंदणीचे कागदपत्रे शासनास सादर करावीत. तसे न केल्यास अग्रिम धारकाकडून अग्रिमाची संपूर्ण रक्कम १ महिन्यानंतर दंडनीय व्याजासह एक रकमी वसुल करण्यात यावी,
९. मोटार कार अग्रिमाची व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत मोटार कार शासनाकडे गहाण राहील. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांस विहित नमुन्यात व कार्यपध्दत्तीप्रमाणे गहाणखत भरून देणे आवश्यक राहील. गहान खतामध्ये मोटार कारचा मेक (MAKE), मॉडेल (MODEL) आणि चेसिस क्रमांक (CHASSIS NO) स्पष्टपणे नमूद करण्यात यावा. नवीन किंवा जुनी मोटार कार अग्रिम धारकाकडून नियमानुसार आवश्यक ते विहित नमुन्यातील करारपत्र (नमुना-२०), गहाण बंधपत्र (नमुना-२१, २१९), दुय्यम बंधपत्र (नमुना-२२) व प्रतिभूती बंधपत्र (नमुना-२२ए) घेण्यात वावीत.
१०. तसेच, असे गहाणखत भरून देण्यापूर्वी सदर मोटार कार यांत्रिकी दृष्टया निर्दोष आहे याची जबाबदारी अग्रिम घेण्या-या संबंधित अधिकाऱ्याची राहील. त्याप्रमाणे जर एखादया प्रसंगी यांत्रिकी दृष्टया निर्दोष नसलेली मोटार कार शासनाकडे गहाण ठेवली गेल्यास व अशा मोटार कारच्या अग्रिमाच्या वसुलीसाठी लिलावाने विक्री करावयाचा प्रसंग उद्भवल्यास अशा लिलावापासून येणाऱ्या रक्कमेपेक्षा शिल्लक राहणारी वसूलपात्र रक्कम दंडनीय व्याजासह संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवा उपदान, रजेचे रोखीकरण इत्यादी अनुज्ञेय रकमांमधून वसूल करण्यात यावी.सांकेतांक क्रमांक 202310171234430905
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.