Thursday, July 24, 2025
Thursday, July 24, 2025
Home » महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदव्यूत्तर पदविका व पदव्यूत्तर पदवी अहर्ता व वेतनवाढ

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदव्यूत्तर पदविका व पदव्यूत्तर पदवी अहर्ता व वेतनवाढ

0 comment

पदविका व पदव्यूत्तर पदवी शैक्षणिक अहर्ता धारकास अनुक्रम ३ व ६ प्रोत्साहनपर वेतनवाढी मंजूर करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनां०३-०५-२०२१


महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ वेतन मॅट्रीक्स मधील वेतन स्तर एस-२३:६७७००-२०८७०० (६ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी रु. १५६००-३९१०० ग्रेड पे रु. ६६००) मधील व त्यापेक्षा अधिक वेतनश्रेणीमधील जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, पोलीस शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, विशेषज्ञ संवर्ग, उपसंचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक व संचालक, आरोग्य सेवा या पदावरील पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी शैक्षणिक अर्हताधारण करणाऱ्या अधिकाऱ्यांना (सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह) दि. २०/८/२०१४ ऐवजी दि. १४/१२/२०११ पासून अनुक्रमे ३ व ६ अतिरिक्त प्रोत्साहनात्मक वेतनवाढी मंजूर करण्यात येत आहेत.
मात्र, वेतन मॅट्रीक्स मधील वेतन स्तर एस-२३:६७७००-२०८७०० (वेतनश्रेणी रु. १५६००-३९१०० ग्रेड पे रु. ६६००) मधील व त्यापेक्षा अधिक वेतनश्रेणीतील ज्या अधिकाऱ्यांनी शासन निर्णय दि. १४/१२/२०११ व दि. १९/११/२०१२ चा लाभ घेतला असेल त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही.

शासन सेवेतील स्थायी स्वरूपात वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्त झाल्यानंतर पदविका व पदव्यूत्तर पदवी धारकास ६/३ विशेष वेतनवाढी मंजूर करणे बाबत मा सहसंचालक मुंबई यांचे पत्र दि ०८-०२-२०१८

शासन निर्णयान्वये रुपये ५४००/- व त्यावरील वेतनश्रेणीवर कार्यरत असणा-या गट अ वैद्यकिय अधिका-यांना सदर लाभ अनुज्ञेय करण्यात आलेले आहेत. परंतू संचालनालयाच्या असे निदर्शनास आलेले आहे की, ३ व ६ वेतनवाढींचा लाभ घेतलेले काही वै‌द्यकिय अधिकारी हे विशेषज्ञाच्या सेवा पुरवित नाहीत. त्यामुळे जे अधिकारी विशेषज्ञ सेवा देत नाहीत त्यांना ३-६ वेतनवाढी देऊ नये व दिल्या असल्यास त्या वसूल करण्यात याव्यात.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या मधील पदव्यूत्तर पदविका व पदव्यूत्तर पदवी धारकास ६ व ३ विशेष वेतनवाढी मंजूर करणे बाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनां २०-०८-२०१४

 
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ मधील वेतनबँड रु १५६००-३९१०० ग्रेड पे ६६०० व याहून अधिक वेतनश्रेणीच्या पदावर कार्यरत असणाऱ्या विशेषज्ञ संवर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातील, पोलीस शल्य चिकित्सक तसेच उपसंचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक व संचालक, आरोग्य सेवा या पदावरील पदव्युत्तर पदविका व पदव्युत्तर पदवी शैक्षणिक अर्हताधारक अधिकाऱ्यांना अनुक्रमे ३ व ६ अतिरिक्त प्रोत्साहनात्मक वेतनवाढी मंजूर करण्यात येत आहेत.
२. सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून या प्रोत्साहनात्मक वेतनवाढी लागू राहतील.
३. ज्या अधिकाऱ्यांनी शासन निर्णय दिनांक १४.१२.२०११ व दिनांक १९.११.२०१२ मधील तरतुदींनुसार प्रोत्साहनपर वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय आहे, अशा अधिकाऱ्यांना या शासन निर्णयाचा पुन्हा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही.
४. जे अधिकारी एकापेक्षा अधिक पदव्युत्तर पदविका धारण करीत आहेत, त्यांना कमाल ३ वेतनवाढी अनुज्ञेय राहतील. तसेच जे अधिकारी पदव्युत्तर पदवी अथवा पदव्युत्तर पदविपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत, अशा अधिकाऱ्यांना कमाल ६ वेतनवाढी अनुज्ञेय राहतील.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी पदावरील पदव्यूत्तर पदविका व पदव्यूत्तर पदवी अहर्ता धारकास विशेष वेतनवाढी मंजूर करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनां १९-११-२०१२


महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी (वेतनश्रेणी रु.१५६००-३९१०० + ग्रेड पे रु.५४००) या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पदवीका अर्हताधारकास तीन अतिरिक्त वेतनवाढी व पदव्युत्तर पदवी अर्हताधारकास सहा अतिरिक्त वेतनवाढी सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. मवैअ-२०११/प्र.क्र.७७६/११/सेवा ३, दि.१४.१२.२०११ अन्वये मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
२. “कार्यरत विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय राहील किंवा कसे” या बाबत सदर शासन निर्णयाच्या व्याप्ती संदर्भात अधिक स्पष्टीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता, या शासन निर्णयान्वये प्रस्तूत बाब स्पष्ट करण्यात येत आहे की, आरोग्य सेवेतील महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, वैद्यकीय अधिकारी गट-अ (वेतनश्रेणी रु.१५६००-३९१०० + ग्रेड पे रु.५४००) या संवर्गात दि. १४.१२.२०११ रोजी कार्यरत असलेल्या व त्यानंतर वरीष्ठ पदावर पदोन्नत झालेल्या तसेच अश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरीष्ठ पदाची चेतनश्रेणी प्राप्त असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभाग शासन अधिसूचना क्र. आरटीआर-१०९१/प्र.क्र.२२६/सेवा-३. F/GR….. 1
दि.३०.१०.२००० मधील नियम ३ (क) खालील परंतूकानूसार सदर पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक अर्हतेशिवाय वैद्यक शास्त्रातील (उच्चतर शैक्षणिक अर्हता) संविधिक विद्यापीठाची चिकित्सा विशेषज्ञाची पदव्युत्तर पदवी / पदव्यूत्तर पदविका अर्हताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय दि.१४.१२.२०११ अनुसार अनुज्ञेय करण्यात आलेल्या प्रोत्साहानात्मक वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय राहील.
३. तथापि, ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे एका पेक्षा अधिक पदव्युत्तर पदविका धारण करीत असल्यास त्यांना कमाल तीन वेतन वाढी अनुज्ञेय राहतील. तसेच ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे एक पदव्युत्तर पदविका व एक पदव्युत्तर पदवी प्राप्त असल्यास किंवा एका पेक्षा अधिक पदव्युत्तर पदवी असल्यास त्यांना कमाल सहा वेतनवाढी अनुज्ञेय राहतील.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती झाल्यानंतर पदव्यूत्तर पदविका पदव्यूत्तर पदवी अहर्ता धारकास सहा वेतनवाढी मंजूर करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दिनां १४-१२-२०११

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी (वेतनश्रेणी १५६००-३९१०० + ग्रेड पे ५४००) या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पदव्युत्तर पदवीका धारकास तीन अतिरिक्त वेतनवाढी व पदव्युत्तर पदवी धारकास सहा अतिरिक्त
C:\Documents and Settings\admin\Desktop\MO GR for increment.docl
वेतनवाढी मंजूर करण्यात याव्यात. सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून या प्रोत्साहनपर वेतनवाढी लागु करण्यात याव्यात.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

45783

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.