Sunday, October 25, 2026
Sunday, October 25, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : वैयक्तिक लाभाच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदी- MGNREGS : Purchase of materials required for work yielding personal benefit

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : वैयक्तिक लाभाच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदी- MGNREGS : Purchase of materials required for work yielding personal benefit

0 comment 245 views

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत घेण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी विक्रेत्यांची (Vendor) निवड करणेबाबत.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो) शासन परिपत्रक क्र. मग्रारो-२०१५/प्र.क्र.९७/मग्रारो-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक :- ०७ सप्टेंबर, २०१५


प्रत्यक्ष साहित्य खरेदी प्रक्रिया –
a. तांत्रिक अधिका-याने या कामांसाठी मंजूर अंदाजपत्रकानुसार (साहित्य आवश्यक परिमाण प्रपत्र) (Material consumption statement) लागणा-या साहित्याबाबतचा तपशील ग्रामपंचायतीकडे सादर करावा. (परिशिष्ट-‘अ’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे).
b. लाभार्थीनी साहित्याच्या आवश्यकतेनुसार ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा.
c. ग्रामपंचायत अंमलबजावणी यंत्रणा असल्यामुळे, साहित्य पुरवठा ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावा.
d. मंजूर दरानुसार व तांत्रिक अधिका-याने प्रमाणित केलेल्या परिमाणाच्या मर्यादेत, ग्रामपंचायतीने लाभार्थीच्या मागणीनुसार निश्चित विक्रेत्याला पुरवठा आदेश निर्गमित करावे. पुरवठा आदेशाची प्रत लाभार्थ्याला देण्यात यावी. (पुरवठा आदेश नमुना – परिशिष्ट- ‘ब’).
e. लाभार्थ्याने विक्रेत्याकडे संपर्क साधून परिशिष्ट ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे साहित्याची उचल करावी.
निश्चित केलेल्या विक्रेत्याने ग्रामपंचायतीच्या नावाने देयके सादर करावे. देयकावर ग्रामपंचायतीच्या नावासोबत कंसामध्ये लाभार्थीचे नाव नमूद करावे.

देयके अदा करण्याची पध्दत :
a. पुरवठा केलेल्या साहित्याचा वापर कामात झाल्यानंतर, तांत्रिक अधिका-याने त्याचे मुल्यांकन करावे.
b. मुल्यांकनानंतर मोजमाप पुस्तिकेत (MB) मोजमापे नोंदवून ग्रामपंचायतीकडे सादर करावे.
c. ग्रामपंचायतीने मुल्यांकनाच्या मर्यादेत विक्रेत्याला देयकाची रक्कम धनादेश/ RTGS व्दारे अदा करावी.
d. मुल्यांकनाची रक्कम देयकाच्या रकमेपेक्षा कमी आढळल्यास, फरकाची जबाबदारी लाभार्थीवर राहील.

htps://gramvikaseseva.com/mregs-social-audit/

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment