‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम’
२. उद्दिष्टे
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेसाठी पुढीलप्रमाणे उद्दिष्टे ठरविण्यात येत आहेतः-
१) गाव पातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून उपक्रम राबविणे,
२) दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणा-या तंट्यांचे निराकरण करुन ते कमी करणे,
३) गावासाठी गांवातच लोकसहभागातून तात्काळ व सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे,
४) गांवातील जनतेमध्ये जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे,
५) पोलिसांच्या कामामध्ये पारदर्शकता आणून त्यांची जनमानसातील प्रतिमा सुधारुन ‘जनतेचे सेवक’ अशी प्रतिष्ठा प्राप्त करणे,
६) लोकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्यांचे निर्मूलन करणे,
७) भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करणे,
८) अनिष्ट प्रथा व चाली-रीती नष्ट करण्यासाठी लोकांच्यामध्ये जागृती निर्माण करणे.सांकेतांक २००७०७२०१६५०५९००१
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
-
523
-
521
-
559
-
947
-
365
-
351