376
आपल्या सुलभते साठी व अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र जमीन महसूल ( भोगवटादार वर्ग २ आणि भाडे पट्ट्याने धारण जमीनी भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपातंरित करणे नियम २०२५
अटी -
१) स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना उपलब्ध होणाऱ्या वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकापैकी (FSI) २५% चटईक्षेत्र (FSI) प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना द्यावे लागेल. जर अतिरिक्त/वाढीव चटईक्षेत्र (FSI) उपलब्ध होत नसेल तर, सहकारी गृहनिर्माण संस्था ५% अधिमूल्य आकारणीच्या सवलतीस पात्र राहणार नाही.
तसेच, स्वयंपुनर्विकास करणाऱ्या संस्थेने वाढीव चटईक्षेत्राच्या २५% क्षेत्र प्रधानमंत्री आवास योजनेसाठी (PMAY) उपलब्ध करून न दिल्यास या प्रयोजनाकरीता भरण्यात आलेली अधिमूल्याची रक्कम शासन जमा करण्यात येईल व असे भूखंड पुन्हा वर्ग-२ समजण्यात येतील.
२) स्वयंपुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थेने सदर योजनेचा लाभ घेतल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत स्वयंपुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक राहील. सदर तरतुदीनुसार स्वयंपुनर्विकासाची प्रक्रिया दोन वर्षांत सुरू न झाल्यास त्या दिनांकापासून त्यापुढील दोन वर्षाची मुदतवाढ देण्यास शासन सक्षम प्राधिकारी असेल. तथापि, मुदतवाढीच्या विहीत कालावधीमध्ये स्वयंपुनर्विकासाची प्रक्रिया सुरू न झाल्यास या प्रयोजनाकरीता भरण्यात आलेली अधिमूल्याची रक्कम शासन जमा करण्यात येईल व असे भूखंड पुन्हा वर्ग-२ समजण्यात येतील.
३) भोगवटादार वर्ग-२ अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींचे रुपांतरण करण्यासाठीच्या अधिमूल्याची रक्कम रू.१ कोटीपेक्षा अधिक येत असेल, अशा प्रकरणी राज्य शासनाची पूर्व मान्यता घेतल्याखेरीज, जिल्हाधिकारी अशा जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरणाचे कोणतेही आदेश पारीत करू शकणार नाहीत. तसेच, अधिमूल्याची रक्कम रू.१ कोटीपेक्षा अधिक असलेली प्रकरणे प्राप्त झाल्यापासून तीन महिन्यात छाननी करून जिल्हाधिकारी असे प्रस्ताव शासन पूर्व मान्यतेस्तव सादर करतील.
४) भोगवटादार वर्ग-२ अथवा भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनींच्या मूळ मंजूर प्रयोजनासाठीचा प्रत्यक्ष वापर सुरू केल्याच्या दिनांकापासून ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याखेरीज, अशा जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरण करता येणार नाही.
५) भोगवटादार वर्ग-२ चे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरण करण्याचे अंतिम आदेश निर्गमित करण्यापूर्वी, अधिमूल्याची रक्कम भरून घेण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटीसीच्या दिनांकापासून तीन महिन्यात अधिमूल्याची रक्कम भरणे आवश्यक
राहील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिक माहितीसाठी & GR साठी येथे क्लिक करा
You Might Be Interested In