Sunday, July 26, 2026
Sunday, July 26, 2026
Home » महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : फळबाग लागवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : फळबाग लागवड

0 comment 7 views

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनातर्गत ग्रामपंचायती मार्फत फळबाग लागवड योजनेची कामे करणे बाबत दिनांक १८-०५-२०२१

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत संदर्भ क्र. १ येथील दिनांक २९.०६.२०११ च्या शासन निर्णयान्वये वैयक्तीक लाभार्थ्यांच्या शेतावर ग्रामपंचायतीमार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. दरम्यान, सन २०१९-२० च्या लेबर बजेट व वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात निर्गमित केलेल्या दिनांक १०.०८.२०१८ च्या शासन परिपत्रकामध्ये फळबाग लागवड कार्यक्रमासाठी कृषी विभाग अमलबजावणी यंत्रणा राहील असे नमूद केले आहे. त्यामुळे वैयक्तीक लाभार्थ्यांच्या शेतावर फळबाग लागवड योजनेकरीता कार्यन्वीन यंत्रणेसंदर्भात संभ्रम निर्माण होत असल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांनी संदर्भ क्र. २ येथील दिनांक ०८.०६.२०२० च्या पत्रान्वये निदर्शनास आणली आहे.
त्यानुषंगाने सूचित करण्यात येते की, "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निर्गमित केलेल्या दिनांक २९ जून, २०११ च्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांच्या जमिनीवर ग्रामपंचायती मार्फत काम करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा तत्सम अधिकारी यांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. गट विकास अधिकारी यांना प्रशासकिय मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. वरील नमूद शासन
निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायती मार्फत फळबाग लागवडीची कामे करता येऊ शकतात महात्मा गांधी नरेगा व शासनाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय / परिपत्रक यांच्या अधिन राहून कार्यवाही करणे आवश्यक राहील."
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा, बोर, आवळा, डाळिंब व संत्रा या फळपिकांचे लागवडीमधील अंतर व कलमे रोपांचे लागवडीचे सुधारित मापदंडाबाबत…
महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक – फळबाग-२०१५/प्र.क्र.७५/रोहयो-५. मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२, दिनांक : ३ सप्टेंबर, २०१६

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेतावर डाळिंब या कोरडवाहू फळपीकाची प्रायोगिक प्रकल्प म्हणून लागवड करणे बाबत.
महाराष्ट्र शासन शासन परिपत्रक क्रमांक: मग्रारो-२०१३/प्र.क्र.११८/मग्रारो-१, नियोजन (रोहयो) विभाग मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक : १९ जून, २०१४

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेतावर आंबा व डाळिंब या फळपीकांचा सुधारित फळबाग लागवड कार्यक्रम राबविणे बाबत.
महाराष्ट्र शासन शासन निर्णय क्रमांक : मग्रारो-२०१३/प्र.क्र.११८/मग्रारो-१, नियोजन (रोहयो) विभाग मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक : २० फेब्रुवारी, २०१४


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेतामध्ये प्रायोगिक तत्वावर इस्त्राईल तंत्रज्ञानावर
आधारित संत्रा फळबाग लागवड कार्यक्रम राबविणे बाबत. क्रमांक : मग्रारो-२०१३/प्र.क्र.१४२/मग्रारो-१, नवीन प्रशासकीय भवन, १६ वा मजला, मादाम कामा मार्ग, राजगुरू हुतात्मा चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक : ०७ डिसेंबर, २०१३

https://gramvikaseseva.com/wp-content/uploads/2026/07/20.1.2012-GR-Horticulture-for-Ind.-Bene.-EGS-10A.pdf

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तीक लाभार्थ्यांच्या शेतावर ग्रामपंचायतीमार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत …..
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मग्रारो २०११/प्र.क्र. ५८/रोहयो-१०-अ, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : २९ जून, २०११.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

479842

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions