महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट (e-muster) निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना देणेबाबत 09-02-2024 202402091741013216
ई-मस्टर निर्गमित करण्यासाठी केंद्र चालक यांची जबाबदारी
१) सदर कामावर हजर राहणा-या अपेक्षित मजूरांची यादी प्राप्त झाल्यानंतर www.nrega.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरुन GP Login मध्ये जावून demand upload करणे. (D.३ Works Demand-demand for work entry)
२) www.nrega.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरुन GP Login मध्ये जावून नविन कामाकरीता Work Code Generate करणे. (D.४ Works)
३) Demand upload झाल्यानंतर याच संकेतस्थळावरुन यादीतील मजुरांना Work allocation ची प्रक्रिया पूर्ण करणे (D.५ Works Allocation- work allocation entry) व तालुका स्तरावरील ई- मस्टरशी संबंधीत ऑपरेटर ला दुरध्वनीवरुन या बाबीची सुचना देणे.
४) तालुका स्तरावरील ऑपरेटर PO Login मधुन या Demand ला Approve/issue (D.७.१-Generate E-muster Roll) केल्यानंतर सदर ई-मस्टरची प्रिंट GP Login मधून काढणे. (D.७.२-E-Muster Roll-print E-Muster Roll)
५) प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर ७ दिवसांच्या कामांचे मोजमापानुसार मजुरी दराची नोंद घेऊन पूर्ण भरलेले ई-मस्टरची ग्राम रोजगार सेवकाच्या मदतीने आपले सरकार केंद्रातून डेटा एंट्री करेल (D.७.२-E-Muster Roll-Fill E-Muster Roll) व Wage list Generate(D.C Wage List Generate wage list for payment) व मजुरी प्रदानाच्या पुढील कार्यवाहीकरीता AAO Login ला पाठवेल. (D.८ Wage List-Add payment details to wage list & send).