जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन पूरकपत्र क्रमांकः जिपब-४८१७/प्र.क्र.२२८/आस्था-१४२५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मंत्रालय, मुंबई – ४०० ००१ दिनांक :- २८ मार्च, २०२५
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या संदर्भाधिन शासन निर्णय क्र.जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४ नुसार निश्चित केलेले आहे.
सदर शासन निर्णयातील प्रकरण-१ मधील कलम ३ (क) येथे “विधवा, परित्यक्ता/घटस्फोटित महिला कर्मचारी यानंतर व कर्करोगाने (कॅन्सर) आजारी/पक्षघाताने आजारी/डायलेसिस सुरु असेलेले कर्मचारी या अगोदर “४० वर्षावरील वयाच्या अविवाहित महिला कर्मचारी” असा मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी. मान्यताप्राप्त संघटनेबाबत स्पष्टीकरण
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन पूरकपत्र क्र.: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.४२३/आस्था-१४ २५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई-४०० ००१. दिनांक : २० सप्टेंबर, २०२२.
"जिल्हा परिषद (शिक्षक वगळून) कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार मान्यताप्राप्त संघटना म्हणजे ज्या संघटना Maharashtra Recognition of Trade Union and Prevention of Unfair Practice Act, १९७१ अंतर्गत औद्योगिक न्यायालयाकडून मान्यता प्राप्त संघटना होय. अशाप्रकारे मान्यताप्राप्त राज्य / जिल्हा पातळीवरील प्रतिनिधी असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष, सरचिटणिस, कोषाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष असेल अशा चार कर्मचाऱ्यांचा (संघटनेचे पदाधिकारी) पदावधी वाढविता येईल. त्याचा पदावधी जिल्हा मुख्यालयी पदाधिकारी म्हणून निवड झाल्यापासून जास्तीत जास्त (प्रशासकीय कालावधी १० वर्षे + वाढीव कालावधी ५ वर्षे) वर्षापर्यंत वाढविता येईल. तसेच, बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी सदर पदाधिकाऱ्याने पाच वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर व तो पदाधिकारी म्हणून कार्यरत असल्यास त्याला पुन्हा तालुक्याच्या गावी / जिल्हा मुख्यालयी नेमणूक देता येईल."
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड च्या कर्मचा-याच्या बदल्याबाबत ग्रा विवि जिपब/प्र क्र १०८/आस्था १४ दि २४/०५/२०१८ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.
सद्यःस्थितीत राज्यात स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ, विधानसभा पोटनिवडणूक, लोकसभा पोटनिवडणूक, इ. निवडणूकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला असून, संबंधित जिल्हयांतील संबंधित मतदारसंघांच्या क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.
२. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन कळविण्यात येते की, जिल्हा परिषदेच्या गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत शासन निर्णय दि.१५ मे २०१४ अन्वये विहित करण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात येत असून, चालू वर्षी ज्या जिल्हयांमध्ये निवडणूकीची आचारसंहिता लागू आहे, अशा जिल्हयांमध्ये सदर बदल्या आचारसंहिता संपल्यानंतर, म्हणजेच सर्वसाधारणपणे दि. १५ जून् २०१८ पर्यंत करण्यात याव्यात्.

जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग ३) व गट- ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्याच्या बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-४८१६/प्रक्र १३६/ आस्था-१४ दि ०२/०१/२०१७ अधिक माहितीसाठी व download साठी येथे click करा.

जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग ३) गट ड (वर्ग ४) च्या कर्मचा-च्या बदल्याच्या धोरणाची अमलबजावणी ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १५-०५-२०१४ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा. अत्यंत महत्वाचा शासन निर्णय
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबतचे उक्त शासन निर्णय / शुध्दीपत्रके / परिपत्रक अधिक्रमित करुन या शासन निर्णयाच्या प्रकरण १ ते ५ नुसार सर्व समावेशक सर्वसाधारण बदल्यांचे धोरण, कार्यपध्दती व निकष निश्चित करण्यात येत आहेत. या निकषांनुसार जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबतची कार्यवाही करण्यात यावी. या शासन निर्णयाद्वारे पूर्वीच्या धोरणात करण्यात आलेल्या सुधारणा ठळक अक्षरात दर्शवून अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत.
शासन निर्णय क्रमांकः जिपब-४१४ / प्र.क्र.११२/आस्था-१४
२. गट- क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांपूर्वी तसेच समुपदेशन प्रसंगी सादर करावयाचा नमुना परिशिष्ट- १ प्रमाणे असेल. त्याप्रमाणे बदलीपात्र / इच्छुकांनी अर्ज सादर करावे. सदर बदल्यांबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यावर सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-२ मध्ये दर्शविलेल्या विहित विवरणपत्रामध्ये माहिती भरुन ती दरवर्षी दिनांक ३० जूनपर्यन्त शासनाकडे पाठवावी.
३. बदलीसंबंधाने कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये याबाबत विभागीय आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. विहित पध्दतीनुसार प्रशासकीय बदल्या करणे आवश्यक आहे. अन्यथा कसूर करणारा अधिकारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील. बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार प्राप्त झाल्यास त्याअनुषंगाने अनियमितता दूर करण्याच्या व अनियमिततेस जबाबदार असणाऱ्याविरुध्द नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही विभागीय आयुक्त यांनी करावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग ३) व गट- ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्याच्या बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-०७१२/प्रक्र १५५/ आस्था-१४ दि १८/०४/२०१३ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.
जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मवाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबतचे संदर्भाधीन शासन आदेश अधिक्रमित करुन (दिनांक ५-४-२०१३ च्या शासन निर्णयातील वेळापत्रक वगळता ज्याचा समावेश या शासन निर्णयात आहे) या शासन निर्णयाच्या प्रकरण १ ते ५ नुसार सर्वसाधारण बदल्यांचे धोरण, कार्यपध्दती व निकष निश्चित करण्यात येत आहेत. या निकषांनुसार जिल्हा परिषदेच्या गट- क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
२) गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांपूर्वी तसेच समुपदेशन प्रसंगी सादर करावयाचा नमुना परिशिष्ट- १ प्रमाणे असेल. त्याप्रमाणे बदलीपात्र/इच्छुकांनी अर्ज करावे. सदर बदल्यांबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यावर सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-२ मध्ये दर्शविलेल्या विहित विवरणपत्रामध्ये माहिती भरुन ती दरवर्षी दिनांक ३० जूनपर्यन्त शासनाकडे पाठवावी.
बदलीसंबंधाने कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये याबाबत विभागीय आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. विहित पध्दतीनुसार प्रशासकीय बदल्या करणे आवश्यक आहे. अन्यथा कसूर करणारा अधिकारी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील. बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार प्राप्त
शासन निर्णय क्रमांकः जिपब-०७१२/ प्र.क्र.१५५/आस्था-१४,
झाल्यास त्याअनुषंगाने अनियमितता दूर करण्याच्या व अनियमिततेस जबाबदार असणाऱ्याविरुध्द नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही विभागीय आयुक्त यांनी करावी.
४) गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या बदल्यांसंदर्भात शासन वेळोवेळी आदेश देईल ते आदेश सर्व जिल्हा परिषदांना / पंचायत समिती यांना बंधनकारक राहतील.
बदल्यांसाठीचे वेळापत्रक संदर्भाधीन क्रमांक (४) येथील दिनांक ५ एप्रिल २०१३ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली कार्यवाही जशीच्या तशी राहील. तसेच बदल्यांबाबतची पुढील कार्यवाही या शासन निर्णयात अंतर्भूत असलेल्या दिनांकानुसार करण्यात यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याच्या जिल्हातर्गत बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-०८११/प्रक्र १२२/आस्था-१४ दि २०/०४/२०१२ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याच्या जिल्हातर्गत बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-२०९ /प्रक्र २०/ आस्था-१४ दि २७/०५/२००९ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्याच्या जिल्हातर्गत बदल्याच्या धोरणाची अंमलबजावणी ग्रावि व जल वि शा नि क्र जिपब-१०८/प्रक्र १६/ आस्था-१४ दि ३०/०४/२००८ अधिक माहिती साठी व download साठी येथे click करा.
Transfer of Zilla Parishad Servant 22-12-1962
1 comment
[…] […]