Friday, October 16, 2026
Friday, October 16, 2026
Home » महाराष्ट्र जिल्हा परिषदा [नामनिर्देशित सदस्य पात्रता व नियुक्ती ] -Maharashtra Zilla Parishads [Eligibility and Appointment of Nominated Members]

महाराष्ट्र जिल्हा परिषदा [नामनिर्देशित सदस्य पात्रता व नियुक्ती ] -Maharashtra Zilla Parishads [Eligibility and Appointment of Nominated Members]

0 comment 38 views

महाराष्ट्र जिल्हा परिषदा [नामनिर्देशित सदस्य पात्रता व नियुक्ती ] – 2026 Maharashtra Zilla Parishads [Eligibility and Appointment of Nominated Members, ग्रामविकास विभाग, अधिसूचना दिनांक : 21-08-2026

३. नामनिर्देशित सदस्यांची संख्या निश्चित करणे .- नियम ४ मधील तरतुदींच्या अधीन राहून, जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेमध्ये
नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांची संख्या जिल्हा परिषदेच्या एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा किमान पाच व्यक्ती,
यांपैकी जी संख्या जास्त असेल त्याप्रमाणे निश्चित करून नामनिर्देशन करतील.
४. नामनिर्देशनासाठी पात्रता .- एखादी व्यक्ती नामनिर्देशित सदस्य पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित होण्यास पात्र असेल,
जर तिला जिल्हा परिषदेच्या प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान किंवा कार्यानुभव असेल आणि ती,-
(अ) संबंधित जिल्हा परिषद क्षेत्राची रहिवाशी असेल; आणि
(ब) राज्यातील मान्यताप्राप्त व नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक (Medical Practitioner) म्हणून किमान पाच वर्षे
कार्यरत असेल; किंवा
(क) मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयांमधील सेवानिवृत्त प्राध्यापक, व्याख्याते किंवा प्राचार्य यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ
म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असलेली; किंवा
(ड) कृषी, जलसंधारण, सहकार, ग्रामीण विकास, महिला व बाल विकास, कला, साहित्य, समाजकार्य या क्षेत्रांमध्ये विशेष
ज्ञान असलेली आणि वरीलपैकी कोणत्याही क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असलेली; किंवा
(ई) मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी धारण केलेली आणि अभियांत्रिकी क्षेत्रात किमान पाच वर्षांचा व्यावसायिक
अनुभव असलेली; किंवा
(फ) किमान पाच वर्षे वकील (Advocate) म्हणून कार्यरत किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवी (Law Degree)
धारण केलेली आणि राज्यातील विधी क्षेत्रात किमान पाच वर्षांचा अनुभव असलेली; किंवा
(ग) केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या सेवेत किमान वीस वर्षांची सेवा पूर्ण केलेला सेवानिवृत्त अधिकारी असलेली; किंवा
(घ) महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमांतर्गत नोंदणीकृत अशासकीय संस्थेचा (Non-Government
Organization) पदाधिकारी म्हणून, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात सामाजिक कल्याणविषयक उपक्रमांमध्ये
कार्यरत राहून किमान पाच वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती असेल.

सविस्तर व अधिक माहितीसाठी दिनांक : 21-08-2026 ही pdf download करून माहिती प्राप्त करून घ्यावी.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा [नामनिर्देशित सदस्य पात्रता व नियुक्ती ] – 2026 Maharashtra Zilla Parishads [Eligibility and Appointment of Nominated Members, ग्रामविकास विभाग, अधिसूचना दिनांक : 03-07-2026

या अधिसूचेने च्या दिनांका पासून 30 दिवसाचे आत प्राप्त होणा-या सदर मसुदा नियमावरील हरकती अथवा सूचना मागविण्यात आलेल्या आहेत.

#zp #Zilla parishad #panchayat samiti #ps #DVDF #mukhymantrisamrudhiabhiyan #mspa #governmentofmaharashtra #maharashtra#checklist #MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #DIVABATTI TAX #FACTORY TAX #Government Decision #Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees #GRAMPANCHAYAT KAR AKARNI, #GRAMPANCHAYAT TAXES #KARKAHANA TAX #Maharashtra Government #MAJI SANIK TAX #MIDC #MIDC TAX #MOBILE TOWER TAX #PAVAN CHAKKI TAX #PROPERTY TAX #SANIK VIDHVA TAX, #SANITARY TAX #SOLAR PROJECT TAX #TAX FREE #taxation-at-industrial-rate #Encrochment #gharkul #Pandit dindayal upadhay gharkul #atikraman #permision #building #construct #Maharashtra Regional and Urban Planning Act

https://gramvikaseseva.com/sarpanch-upsarpanch-disqulify

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment