Sunday, September 27, 2026
Sunday, September 27, 2026
Home » जिल्हा ग्रामविकास निधी : ग्रामपंचायतीस कर्ज (DVDF )

जिल्हा ग्रामविकास निधी : ग्रामपंचायतीस कर्ज (DVDF )

0 comment 3.9K views

मुंबई ग्रामपंचायत ( जिल्हा परिषदांनी कर्ज देणे ) नियम १९६९

प्रत्येक ग्रामपंचायतीच्या स्वत: च्या उत्पन्नातून, उत्पन्ना च्या ०.२५ % एवढी रक्कम दरवर्षी जिल्हा ग्रामविकास निधीमध्ये वर्गणी म्हणून जमा करण्यात करण्यात येते (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १३३ अन्वये).

जिल्हा स्तरावर असणाऱ्या निधी मधून ग्रामपंचायतीस विकास कामासाठी कर्ज घेता येईल. कर्ज घेण्यासाठी ग्रामपंचायतीने विहित नमून्यातील अर्जासोबत आवश्यक असलेली रक्कम, कर्ज घ्यावयाचे कारण, खर्चाचा अंदाज, त्याची व्यवस्था ठेवण्यासाठी येणारा खर्च, कर्ज परतफेड करावयाची मुदत व हप्त्यांची संख्या इत्यादी माहिती ग्रामपंचायतीच्या मासिक ठरावाद्वारे मंजूरी घेऊन प्रस्ताव जिल्हा परिषदेस सादर करावा. अंदाजपत्रकाचे २५ टक्के रक्कम ग्रामनिधी खात्यात असणे आवश्यक आहे. कर्ज प्रस्तावासोबत पूर्वीच्या वर्षाच्या अखेरीस असलेली शिल्लक पासबुकाच्या झेरॉक्स सह दर्शविण्यास आली पाहिजे. मागील तीन वर्षाचे जमा व खर्चाचे अहवाल, चालू आर्थिक वर्षाचे व पुढील दोन वर्षाचे अंदाजपत्रक, अंदाजे उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावयाचे ठरविले असल्यास त्याचे विवरणपत्र प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे. स्थायी समिती अर्जाची तपासणी करुन कर्ज घेण्याचा उद्देश, पंचायतीची आर्थिक स्थिती, कर्ज फेडण्याची क्षमता इत्यादी बाबींचा विचार करुन कामाचे अंदाजपत्रकीय रकमेच्या ७५% एवढी रक्कम कर्ज म्हणून मंजूर करेल. कर्ज परतफेड २० वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठीची नसावी.कर्जासाठी द.सा.द.शे ५% व्याजदर राहील.कर्ज फेडण्याचे सरपंच / उपसरपंच व पंचायतीचे अधिकृत केलेले कोणतेही दोन सदस्य यांनी विहित नमून्यातील हमीपत्र लिहून दिले पाहिजे.ग्रामपंचायत ज्या कालावधीत कर्ज परतफेड करणार असेल त्या कालावधीच्या वार्षिक अंदाजपत्रकात कर्ज हप्ता परतफेड करण्यासाठी तरतूद केलेली पाहिजे.या निधी अंतर्गत उत्पादक स्वरुपाची विकास कामे घेण्यात यावी.कर्जाचा प्रस्ताव तयार करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (जिल्हा ग्राम विकास) निधी नियम, १९६० मधील नियम १० नुसार प्रस्ताव तयार करण्यात यावा.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील सुधारणा 2004 ची अधिसूचना दिनांक 17-02-2004 च्या शुद्धीपत्रकाच्या अमलबजावणीबाबत ग्रामविकास विभाग दिनांक 26-04-2005

शासन अधिसूचना दिनांक १७ फेब्रुवारी, २००४ अन्वये जिल्हा ग्राम विकास निधीतील ग्रामपंचायतीच्या अंशदानात बदल केले आहे हे आपणास विदितच असेल. त्याप्रमाण आता याMनिधीतील ग्रामपचायतीचे अंशदान आता तिच्या उत्पन्नाच्या ०.२५ टक्के इतके असणार आहे.तरी या सुधारणांची नोंद घेजन त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी अशा सूचना आपणांस पुन्हा देण्यांतग्रेत आहेत. कृपया नोंद घ्याबी.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब मध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना मुंबई जिल्हा ग्रामपंचायत अर्थ संकल्प लेखा नियम 1959 व मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम 1960 मध्ये सुधारणा ग्रामविकास विभाग दिनांक 17-07-2004

२. दिनांक ५ जून २००४ च्या शासन राजपत्रात अधिसूचना क्र. वहीपीएम २६१९/सीआर १०७१(१)/ पीआर४ (२२) दिनांक ५ जून २००४ प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेन्वये मुंबई जिल्हा ग्राम पंचायत (अर्थसंकल्प व लेखा) नियम १९५९ च्या नियम ७ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याची नोंद घेण्यात यावी. या धारणेनुसार आता जिल्हा ग्राम विकास निधीचे अंशदान ग्राम पंचायतीच्या सर्व स्त्रोतातील उत्पन्नाच्या फक्त ०.२५ असल.
दिनांक ११; जून २००४ च्या शासन राजपत्रात अधिसूंचमा क्र. व्हीपीएम २६९९/सीआर १०७१(२)/ पीआर -४ (२२) दिनांक ३. जून. २००४ प्रसिध्द करण्यात आली आहे,/सदर अधिसूचनेन्वये मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी १९६० च्या नियम ६(२) तसेघ १२ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ती प्रामुख्याने ग्राम पंचायतीनी यशवंत ग्राम समृध्दी योजनेसाठी जिल्हा ग्राम विकास निधीमधून बीनव्याजी व दिर्घ मुदतीची कर्जे घ्यावी यासाठीचा आहे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी

जिल्‍हा ग्रामविकास निधी 1960 मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक 03-06-2004

मुख्य नियमांच्या नियम १२ मध्ये- २. मुंबई जिल्हा ग्रामविकास निधी नियम, १९६० (यान. यापुढे ज्यांचा निर्देश ” मुख्य नियम” असा
करण्वत आला आहे) याच्या नियम ६ मध्ये, पोट-नियम (२) नंतर, पुढील मोट-नियम समाविष्ट करण्यात येईल :-
(2-अ) जिल्हा ग्रामविकास निधीतील बरीचशी रक्कम वापरावयाची राहून गेली आहे आणि त्याच्या दुलन्त कर्जाच्या मागण्या फारशा नाहीत, तसेच, ग्रामीण भागाच्या विकासासाठी असा निधी आवश्यक आहे. असे राज्य शासनाच्या निदर्शनास आल्यास, अशा परिस्थितीत, राज्य शासनास, राज्य शासुनाच्या
यशवत ग्राम समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी पंचायतींना कर्ज म्हामून त्या पंचायतीच्या शिल्लक अंश्दान रकमेच्या प्रभाणानुसार अशा निधीच्या काही टक्केवारीचे वाटप करण्याचे स्थायी रामितीला अनुदेश दे।: येतील. अशा कर्जावर नियम १३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कोणतेही वा न आकारण्यात येणार नाही
तथापि , अशा व्याजमुक्त कर्जाची नियम १२ मध्ये विहित केलेल्या रितीने परतफेड करता येईल.
३ ‘क) पो -नियम (१) मध्ये-
(एक) “दहा वर्षांहून अधिक नाही ” या मजकुराऐवजी ” वीस वर्पाह्न अधिक नाही ” हा मजकूर दाखल करण्यात योईल;
(दोन ) पहिल्या परंतुकामध्ये, “पंधरा वर्षे ” या मजकुराऐवजी ” पंतदास वर्ग ” हा मजकूर दाखल करण्यात येईल.
(ख) पोट-नियम (२) च्या परंतुकामध्ये,-
(एक) “दहा वर्षे ” या मजकुराऐवजी ” वीस वर्षे” हा मजकूर दाखल करण्यात येईल;
(दोन) “पंधरा वर्षें” या मजकुराऐवजी ” पंचवीस वर्षे” हा म कूर दाखल करण्यात येईल.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी

मुंबई जिल्हा ग्रामपंचायत (अर्थसंकल्प व लेखा नियम 1959 सुधारणा अधिसूचना अधिसूचना 31-03-2004

मुंबई जिल्हा ग्रामपंचायत (अर्थसंकल्प व लेखा नियम 1959 सुधारणा अधिसूचना दिनांक 17-02-2004

जिल्‍हा ग्रामविकास निधीच्‍या गुंतवणूकी बाबत. 28-02-2003

मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम १९६० चे कलम ५ अन्वये जिल्हा ग्राम विकास निधीमधील रक्कमा गुंतविणे व पुन्हा गुंतविणेबाबत स्पष्ट तरतूद आहे. असे असतांनाही सदर निधी योग्य प्रकारे न गुंतविल्यामुळे व्याजाची हानी झालेली आहे. अशा आक्षेपाचे काही परिच्छेद अनेक जिल्हा परिषदेकडून शासनाला प्राप्त झालेले आहेत. याबाबत शासनाने वेळोवेळी _परिपत्रक ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक-व्हीपीएम-२६९९/ प्र.क्र.१०७१/२२,दिनांक १८-११-९९, क्र .- व्हीपीएम-२६०५/ प्र.क्र.१०७१/२२, दि.२२-११-२००३, क्र .- व्हीपौएम-२६००/ प्र.क्र.१६४३/ २२,दिनक८-१-२००२, क्र .- व्हीपीएम-२६००प्र.क्र.१६४३/२२, दिनांक १६-५-२००२ अन्वये सदर निधी कक्षा प्रकारे गुंतवावा याबाबत मार्गदर्शनपर सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
त्याकडे सर्व संबॉ पतांचे लक्ष वेधण्यांत येत आहे. त्यानुसार सदर निधी योग्य प्रकारे गुंतविणे अपेक्षित आहे. यागबत काही अडचण आल्यास अथवा शंका असल्यास सदर निधी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांचेकडे अधिनस्त असल्यामुळे त्यांनी त्याबाबत आवश्यकतेप्रनाणे जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे मार्गदर्शन घ्यावे असे निदेश देण्यात येत आहेत.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी

जिल्‍हा ग्रामविकास निधीच्‍या गुंतवणूकी बाबत.ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- क्र.व्‍हीपीएम2601/प्र.क्र.1643/22, दिनांक:- 16-05-2002

मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम, १९६० चे कलम ५ अन्वये जिल्हा ग्राम विकास निधीमधील रक्कमा गुंतविणे व पुन्हा गुंतविणेबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. तथापि, सदर गुंतवणूक योग्य प्रकारे होत नसल्यामुळे दिनांक २२ नोव्हेंबर, २००० तसेच, दिनांक ८ जानेवारी, २००२चे समक्रमांकाचे परिपत्रकान्वये सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

२. उपरोक्त सूचनांमध्ये जिल्हा ग्राम विकास निधीमधील मागील तीन वर्षाच्या सरासरी Withdrawls च्या दीडपटीपेक्षा जास्त रक्कमा Saving Accounts मध्ये रहाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत पुर्नविचार करुन शासनाने असा निर्णय घेतला आहे की, जिल्हा ग्राम विकास निधीमधील सर्व शिल्लक रक्कम Saving Accounts मध्ये न ठेवता त्यापैकी जास्तीत जास्त रक्क्म जिल्हा ग्राम विकास निधी नियम, १९६० चे कलम ५ मधील तरतूदीनुसार ३० ते ४५ दिवसाच्या किंवा अधिक कालावधीच्या निश्चित ठेव योजनेत गुंतवावी आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न आणि मूळ रक्कमा अशाप्रकारे गुंतवाव्यात की, ज्यायोगे शासनाला अधिकाधिक उत्पन्न मिळू शकेल आणि व्याजाची हानी होणार नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने सदर रक्कम गुंतवितांना त्यासाठी ग्रामपंचायतींना कर्जासाठी आवश्यक ती रक्कम तत्काळ उपलब्ध होईल नेही तारतम्याने ठरवावे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जिल्‍हा ग्रामविकास निधीच्‍या गुंतवणूकी बाबत. जानेवारी 2002


जिल्हा ग्राम विकास निधीमधील मागील ३ वर्षाच्या सरासरी Withdrawls च्या शासन परिपत्रक :- मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी १९६० चे कलम ५ अन्वये जिल्हा ग्राम विकास निधीमधील रक्कमा गुतंवणे व पुन्हा गुतंवणेबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. तथापि, सदर गुंतवणूक योग्य प्रकारे होत नसल्यामुळे, त्याबाबत महालेखाकार (लेखा परिक्षा) मुंबई यांनी वेळोवेळी आक्षेप घेतलेला आहे. त्यासाठी सदर निधीमधील रक्कमा विनावापर न ठेवता सदर रक्कमांची योग्य प्रकारे कशी गुंतवणूक करता येईल याबाबत उपरोक्त २२ नोव्हेंबर २००० च्या परिपत्रकान्वये शासनाने सूचना दिलेल्या
आहेत. दीडपटीपेक्षा जास्त रक्कमा Current Account मध्ये राहणार नाहीत याची सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना उपरोक्त परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत. मात्र हा निधी चालू खात्यात ठेवण्याचे ठोस कारण दिसत नाही. कारण या खात्यातून दर दिवशी व दिवसातून अनेक वेळा पैसे काढण्याची गरज नसते. ही बाब विचारात घेऊन चालू खात्या ऐवजी (Current Account) सदर निधीमधील मागील ३
वर्षाच्या सरासरी Withdrawls च्या दिडपटीपेक्षा जास्त रक्कमा Saving Account मध्ये राहणार नाहीत याची सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात येत आहेत. तसेच यापुढे जिल्हा ग्राम विकास निधीमधील रक्कमा Current Account मध्ये न ठेवता Saving Account मध्ये ठेवण्यात याव्यात अशाही सूचना देण्यात येत आहेत.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी

जिल्हा ग्रामविकास निधी मुदत ठेवीतील रककमा काढून ठेकेदाराची बिले अदा 04-08-2001

उपरोक्त विषयावरील आपले संदर्भीत पत्र कृपया पहावे. जिल्हा ग्राम विकास निधीमधुन कोणत्या बाबींसाठी कर्ज देता येईल अथवा कोणत्या बाबीसाठी खर्च करता येईल, याबाबत मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी, नियम १९६० मध्ये स्पष्ट तरतुदी आहेत. त्याप्रमाणे सदर निधीचा खालील कारणांसडी उपयोग करता येईल.
१) ग्राम पंचायरतींना कर्ज देण्यासाठी,
२) मुंबई ग्रामपंचाय्त अधिनियम १९५८ चे कलम ४५ मध्ये निर्दीष्ट केलेल्या कारणांबाबतीतील अधिकार व कर्तव्य पंचायर्तीना पार पाडता यावे म्हणुन कर्ज देता येईल.
आयुक्तांचे परवानगीने स्थायी समितीस निधीच्या कामासाठी नेमलेला सेवक वर्ग आणि त्यासाठी अनुषंगीक अशा सर्व बाबीसाठी खर्च करता येईल.
अधिनियमातील तरतुर्दी स्पष्ट असल्यामुळे जिल्हा ग्राम विकास निधीतून ठेकेदारांची बीले अदा करण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त होईपर्यन्त जिल्हा ग्रामीण विकास निधी मुदत ठेवीतील रकमेमधुन ठेकेदारांची बीले अदा करता येणार नाहीत. याचीनोंद घ्यावी व स्थायी समितीच्या निदर्शनासही ही बाब असावी.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी

जिल्हा ग्रामविकास निधी कर्ज बाबत पत्र 30-06-2001

उपरोक्त पत्रान्वये जिल्हा ग्राम पंचायत अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांनी ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा योजनेसाठी भरावयाची १० टक्के लोकवर्गणी भरणेस्तव जिल्हा ग्राम विकास निधी मधून कर्ज मागणी होत असल्यामुळे सदर निधी मधून कर्ज मंजूर करता येईल किंवा कसे याबाबत
मार्गदर्शन मागितले आहे. जिल्हा ग्राम विकास निधी नियम १९६० चे कलम ६(२) प्रमाणे नियमामध्ये अशाप्रकारे कर्ज देण्याची तरतूद नसल्यामुळे कर्ज मंजूर करता येणार नाही. पाणी पुरवठा योजनेसाठी ग्राम पंचायतीने लोकवर्गणी गोळा करणे आवश्यकच आहे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी

जिल्‍हा ग्रामविकास निधीच्‍या गुंतवणूकी बाबत. 22-11-2000

मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम १९६० मध्ये अशी तरतूद करण्यात येते की, स्थायी समितीने वेळोवेळी ग्रामपचायतींना कर्जे देण्यासाठी किंवा ग्राम पचायतीनी दिलेल्या अंशदानाच्या रकमावरील व्याज देण्यासाठी ताबडतोब आवश्यक नसेल तेवढी रक्कम राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या तारणपत्रामध्ये किंवा याबाबतीत राज्य शासन मान्यता देईल अशा तारणामध्ये गुंतवील्या पाहिजेत आणि तशाच स्वरुपाच्या इतर गुंतदणुकीकरोता अशा गुंतदणूकी बदलल्या पाहिजेत आणि तारणपत्रापासून मिळणारे उत्पन्न आणि त्यांच्या दिक्रीने उत्पन्न सदर निधीत परत जमा केले पाहिजे. परंतु महालेखाकार मुंबई यांनी शासनाच्या असे निदर्शनास आणून दिले आहे की काही जिल्हयानव्ये गाम निधीमघाल रक्कमा मोठया प्रमाणावर करंट अकाऊंट मध्ये बिना वापर पडलेल्या असून संबंधित जिल्हा , परिषदेला याबाबत समाधानकारक खुलासा करता आलेला नाही.
जिल्हा ग्राम विकास निधीमधील रक्कम विनावापर पडून न रहाता त्याची योग्य प्रकारे गुतदणूक होऊन त्यापासून व्याजव्दारे उत्पन्नात वाढ झाल्यास शेवटच्या स्तरावरील पंचायत राज संस्था आर्थिक दृष्टया बळकट होण्यास हातभार लागणार आहे. व यामुळे स्थानिक स्तरावरील आर्थिक व प्रशासकीय समस्या सुटण्यास मदत होईल.या हेतूनेच शासनाने दि. १८.११.९९ च्या परिपत्रकान्वये या निधीतील रक्कम काही प्रमाणात इतर शासन/शासन मान्यता तारणामध्ये गुंतविण्याच्या सूचना दिल्या होत्या.मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी झाल्याचे आढळत नाही यासाठी मुंबई ग्राम विकास निधी नियम १९६० मधील निकर्ष लक्षात घेऊन तसेच शासनाच्या सूचना लक्षात घेऊन सदर निधीमधील रकमा विनावापर न ठेवता सदर रकमाची योग्य प्रकारे गुतवणूक होईल याचा अग्रक्रमाने विचार व्हावा तसेच मागील तीन वर्षाच्या सरासरी withdrawls ्या दीडपटापेक्षा जास्त रक्कम ( current accounts) मध्ये राहणार मख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. मात्र अजूनही काही जिल्हा परिषदेमध्ये सदर गुंतवणूकीबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्यामन
महालेखाकार (लेखापरिक्षा) मुंबई यांनी पुन्हा एकदा याबाबत आक्षेप घेतले आहेत यास्तव शासन परिपत्रकातील उपरोक्त सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पुरेपुर काळजी घ्यावी. अशा सूचना देण्यात येत आहेत.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी

जिल्हा ग्रामविकास निधी मसुदा दिनांक 25-8-2000

जिल्हा परिषदाना प्रशासकीय इमारती बांधण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास निधी तून कर्ज मंजूर होण्यासंबधी होत असलेल्या मागण्याबाबत दिनांक 03-07-1995

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ वे क्लम, १३३ व त्याालो तयार करण्यातआलेले मुंबई जिल्हा ग्राम विकास निष्टो नियम, १९६० मथोल तरतृदोसुसार, पंचायतिनी दिलेल्या ५ टक्टे अज्दानातन पत्येक जिल्ह्यात ” जिल्हा ग्राम विकास निष्टो ” स्थापन करण्यात आलेला आहे. सदर निधोया उपयोग हा पंचायतोंना उक्त अनधनियमातोल कलम ५(१) च्या अनरृचोत “एक” मधोल विहोत देनले कर्तत्य पार पाडण्याच्यादृषटोने,पचायतों वर्जे देण्यासाते केा जातो. सदर निधो हा जिल्हा पररिषदेच्या स्थायी समितिकडे निहित असतो.
२) सदर निधो हा जरी जिल्हा परिषदेच्या स्थायो समितीकडे निहित झाला असला तरी तो त्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्र येणाया ग्रामपंचायतीच्या मालकीचा असतो, म्हणजेच , तो एक प्रकारे गंगाजळो स्वरूपाचा असतो. ज्या प्रयोजनासाठो सदर निधो स्थापन करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठो स्थायो समितोने त्या निधोषा वापर करणे आवयक आहे. तदर निधोया जिल्हा परिषद स्थायी समितोला अन्य प्रयोजनासाठो वापर
करता येपार नाहो• सदर निषीचा अन्य प्रयोजनासाठो उपयोग केल्यास, तो नियमबाह्य ठरेल.
3 जिल्हा ग्रामीण विकास निधीतोल ग्राम पंचायतोंनो कर्जा द्वारे वापरला न जाऊ शकणारा शिल्लक निधी, राज्यातोल काहो जिल्हा परिषदांक्इन जिल्हा परीषदेच्याा तदोय इमारतोंच्या बाँधवामासाठी जिल्हा परिषदाना त्या विधोतून कर्ज मंजूर करण्या संबंधोचे प्रस्ताव जिल्हा पिषदेच्या स्थायो समितोच्या शिफारीशीस शासनास प्रक्रप्त झालेले आहेत जिल्हा ग्रामोण विकास निधोतन जिल्हा परिषदाच्या प्राशासकीय इमारतोच्या बांधकामासाठी वा अन्य इतर प्रयोजनासाठी तस्त जिल्हा परिषदांना दर्जाऊ देण्यारंबंधोचो कोपतोहो तरतद नियमात नाही,अशो तरतद नियमांत करणे देखील सयुक्तिक नाहो. या
संबंधीचा आवश्यक तो प्रस्ताव शासनास सादर केल असता जिल्हा ग्रामीण विकास निधीतून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय हमारतोच्या बाधकामासाठो जिल्हा परिषदांसा कर्ज मंज़र करता येणर नाहो- असा निर्षय शासन स्तरावर घेण्यात आला.
4. जिल्हा परिषदांच्या प्रशासकोय हमारतोच्या बांधकाम साठी योजने अंतर्गत कर्ज देण्याची योणन सन १९७६-७७ पासन शासनाने सरु वेसो आहे. या संदर्भात, शसनाचे शासन निर्णय प्र. ग्रावि. दि. क्र. एसो डो ६०८९/सो 13३४८८/२६, दि. २६ मे १९८९ अन्व्येन आदेश जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आपून दिलेले आहेत जिल्हा परिषदांना प्रशरुदोय इमारतोच्या बांधकामासाठी कर्ज मंजूर करण्याच्या द्वष्टोने “६५१५- इतर ग्राम विकास कार्यक्रमासाठो कर्ज-१००-पंचायत राज-४८ कर्ज-प्रशसदीय इमारतो बांधण्यासाठो जिल्हा परिषदाना वर्ज-पंचायत राज सैस्था (६५-१००६५)” या तेआशिषखिलो शासनादडून दर वर्षों तरतृद करण्यात येते, हो मंजूर तरतूद जिल्हा परिषदेच्या मागणीप्रमाणे जिल्हा परिषदांना देण्यात येते.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी

District Village Development Fund 22-9-1994

जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 च्या कलम 130 मधील उपकलम (4) मधील खंड (अ) च्या अनुषंगाने ग्रामीण बँक दिनांक 11-05-1992

जिल्‍हा ग्रामविकास निधीच्‍या गुंतवणूकी बाबत 18-11-1991

जिल्हा परिषदेकडून मोठ्या रकमेची कामे ग्रामपंचायतीस देण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थितीची तपासणी करणेबाबत 25-10-1990

जिल्हा ग्रामीण विकास निधी 23-08-1989

जिल्हा ग्रामविकास निधीच्या रकमा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे 22-02-1989

प्राथमिक शाळा इमारतीच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीला कर्ज देण्याची योजना 22-3-1983

District Village Development Fund 21-07-1980

District Village Development Fund 23-10-1973

District Village Development Fund 07-04-1972

District Village Development Fund 31-07-1971

District Village Development Fund 16-04-1971

District Village Development Fund 27-02-1971

District Village Development Fund 22-05-1970

District Village Development Fund 30-12-1969

Bombay District Village Development Fund 8-01 -1969

District Village Development Fund 17-02-1967

District Village Development Fund 17-01-1967

District Village Development Fund 29-12-1966

Bobay District Village Development Fund 1960 Dt 03-12-1966

District Village Development Fund repayment of loan Dt 17-11-1965

Bobay District Village Development Fund Rules 1960 Instrument in respect of audit of accounts of the fund Dt 21-09-1965

Bobay District Village Development Fund Rules depostining of in the cooperative bank 22-07-1965

Bobay District Village Development Fund Rules Contribution of villages 17-07-1965

Bombay District Village Development Fund 18-06-1965

Bobay District Village Development Fund Rules Dt 08-01-1965

District Village Development Fund 06-01-1965

District Village Development Fund 31-08-1964

District Village Development Fund 13-06-1964

District Village Development Fund 03-04-1964

District Village Development Fund11-07-1963

मुंबई ग्रामविकास निधी नियम 1960 सुधारणा दिनांक 30-08-1962

Bobay District Village Development Fund Rules Dt 01-04-1960

Bobay District Village Development Fund Rules 1960 23-01-1960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

549756

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions